Home महाराष्ट्र “राज्य सरकारने स्वतःची पाठ थोपटत बसण्यापेक्षा आरोग्य यंत्रणेत सुधारणा करण्याची आवश्यकता”

“राज्य सरकारने स्वतःची पाठ थोपटत बसण्यापेक्षा आरोग्य यंत्रणेत सुधारणा करण्याची आवश्यकता”

मुंबई : महाराष्ट्रातील कोव्हिड कामाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं काैतुक केलं होतं. यावर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया देत राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या खरेपणाचा प्रश्नच येत नाही. हे सांगितलं कुणी. प्रेस नोट ही सीएम आॅफिसमधून गेलेली आहे. ही काय पंतप्रधान कार्यालयातून काैतुकाची प्रेस नोट गेलेली नाही. आणि आम्हांला काैतुकाचा त्या ठिकाणी काही वाटत नाही. परंतु आमचं म्हणणं हेच आहे की, मुंबईचं महाराष्ट्रावर आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. आजही त्या ठिकाणी आयसीयू बेड मिळत नाही. आजही त्या ठिकाणी आॅक्सिजन बेड मिळत नाही. आजही रेमडिसिवीर मिळत नाही., असं दरेकर म्हणाले.

आत्ताच थोड्या वेळापूर्वी लातूरचे माझे मित्र आहेत. दयानंद कदम जे उपसभापती त्या ठिकाणी तालुक्याचे होते. त्यांची आई आॅफ झाली. कारण काय तर 6 दिवस मुंबईत बेड मिळाला नाही. आणि जर मग मुंबईमध्ये सगळं सुरळित सुरू आहे. मग त्यावरून लातुरवरून आलेल्या एका महिलेला बेड का मिळाला नाही याचं उत्तर देणार का? त्याच्यामुळं मला वाटतं की, आपली पाट थोपटत बसण्यापेक्षा आरोग्य व्यवस्थेत जी कमतरता त्या सुधारण्याची गरज आहे त्यासाठी आम्ही सगळे सोबत आहोत. पण एखादी पीआर एजन्सी नेमायची, काही बातम्या प्लान्ट करायच्या आणि आपलं काेडकाैतुक करायचं. आता हे बस करा, लोकांना आता समजायला लागलंय की, तुमच्या सगळ्या बातम्या या प्लान्ट आहेत, ठरवून आहेत. त्याच्यामुळे लोकांच्या मनामध्ये आपल्या या पब्लिसिटीचा स्टंट, या कोरोनाच्या उपाययोजना राहिल्या बाजूला, पण यांचा जास्त वेळ पब्लिसिटीत जातोय., असंही दरेकरांनी म्हणत सरकारवर निशाणा साधला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारने प्रचंड गोष्टी दिल्यात म्हणून आज इथली आरोग्य व्यवस्था टिकलीय. पण यांचा एक दिवस असा नाही, की केंद्रावर टीका करण्यात जात नाही. आणि त्याच्यामुळं मला असं वाटतं की, आता या अशा प्रकारच्या गोष्टी थांबवाव्यात. आम्ही सहकार्य करायला तयार आहोत, परंतु त्या ठिकाणी केवळ मॅनेजमेंट पब्लिसिटीचं करून लोकांच्या मनामध्ये आपल्या विषयी चांगला प्रभाव पाडण्याचा प्रयत्न असेल तर तो मिडियातनं होत नसतो. खुर्चीतनं व्हायला पाहिजे. आजही मुंबईच्या ज्या काही व्यवस्था आहेत. त्या नीट लावायला पाहिजेत. आजही जे कोविड व्हॅक्सिन्स आहेत, आजही त्यात कशाचा ताळमेळ नाही, असं म्हणत दरेकरांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“विरोधकांनी केवळ टीका न करता लसीसाठी एखादं पत्र केंद्रालाही लिहावं”

आदित्य ठाकरेंना जसं मंत्रीपद दिलंत, तसंच बहुजनांचं पालकत्व स्वीकारा; पडळकरांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

मोदींनी महाराष्ट्राचं कौतुक केलं, पण फडणवीस टीका करतात, मग योग्य कोण?; जयंत पाटलांचा सवाल

ऑक्सिजनवरील जीएसटी हटवा; जयंत पाटलांची अर्थ मंत्रालयाकडे मागणी