Home महाराष्ट्र ऑक्सिजनवरील जीएसटी हटवा; जयंत पाटलांची अर्थ मंत्रालयाकडे मागणी

ऑक्सिजनवरील जीएसटी हटवा; जयंत पाटलांची अर्थ मंत्रालयाकडे मागणी

मुंबई : करोना रुग्णांना उपचारात महत्त्वाचा असलेल्या ऑक्सिजन आणि ऑक्सिजनजन्य साहित्यावरील जीएसटी हटवण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अर्थ मंत्रालयाकडे केली आहे.

द असोसिऐटेड चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्री ऑफ इंडिया या संस्थेने अर्थमंत्रालयाकडे पत्रव्यवहार करून जीएसटी कमी करण्याची मागणी केली आहे. त्याच पत्राचा आधार घेत जयंत पाटील यांनी कोरोनाच्या संकटात भारतात औषध आणि आरोग्याशी संबंधित उपकरणांची कमतरता भासत आहे. असं म्हणत ऑक्सिजन आणि ऑक्सिजनजन्य साहित्यावरील जीएसटी हटवण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, जीएसटी हटवल्यास आरोग्य यंत्रणेवरील ताण थोड्या प्रमाणात कमी होईल असं मतंही जयंत पाटलांनी यावेळी माडलं.

महत्वाच्या घडामोडी –

‘मराठा आरक्षणासाठी सुप्रीम कोर्टात जावंच लागेल’, पण…; चंद्रकांत पाटलांचा राज्य सरकारला सल्ला

केंद्र सरकार हे जाणून बुजून करत आहे, की त्यांना कामं करता येत नाही- नवाब मलिक

“कोविड सेंटरवर शिवसेना-भाजपच्या महिला नेत्यांची धक्काबुक्की”

“मराठा उमेदवारांना तात्काळ शासकीय सेवेत सामावून घ्या”