मुंबई : कोरोना संकटाच्या काळात अनेक व्यवसाय-धंद्यांवर परिणाम झाला आहे. त्यामुळे हॉटेल व्यावसायिक आणि आदरातिथ्य क्षेत्रातील समस्यांबाबत पवारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. त्यांच्या या पत्रावरुन भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधलाय.
माननीय पवार साहेबांनी बारमालकांना वीज बिलात सवलत द्यावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे, याच कळकळीने आपण शेतकऱ्यांसाठीही एखादे पत्र पाठवाल अशी अपेक्षा आहे, असं अतुल भातखळकर म्हणाले आहेत.
दरम्यान, 100 कोटींच्या बोजाने दबलेल्या बार मालकांबाबत आपली कळकळ पाहून माझा कंठ दाटून आला आहे हे मी नमूद करू इच्छितो’, असा टोलाही भातखळकर यांनी यावेळी लगावला आहे.
मा. @PawarSpeaks साहेबांनी बारमालकांना वीज बिलात सवलत द्यावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे, याच कळकळीने आपण शेतकऱ्यांसाठीही एखादे पत्र पाठवाल अशी अपेक्षा आहे. १०० कोटींच्या बोजाने दबलेल्या बार मालकांबाबत आपली कळकळ पाहून माझा कंठ दाटून आला आहे हे मी नमूद करू इच्छितो. pic.twitter.com/w1iatu9T43
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) May 7, 2021
महत्वाच्या घडामोडी –
शरद पवारांच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र; म्हणाले..
अजितदादा धडाडीचे नेते, ते उपमुख्यमंत्री झाल्यावर का बदलले?
“पंतप्रधान मोदीसाहेब, बंगाल मधील पराभवाचा राग पेट्रोल डिझेलवर का काढताय?”
ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल आणि इंग्लंड विरूद्धच्या सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा