पुणे : मराठा आरक्षणावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार टीका होत आहे. अशातच माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी मराठा आरक्षणावरून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.
अजितदादा धडाडीचे नेते आहेत. मला त्यांच्याविषयी आदर असून ते उपमुख्यमंत्री झाल्यावर का बदलले हे मला समजत नाही. विरोधात होते त्यावेळी मराठा आरक्षणाच्या विषयावर ते प्रत्येकवेळी माझ्याशी बोलायचे. आता ते काही बोलत नाहीत, असं नरेंद्र पाटील यावेळी म्हणाले.
दरम्यान, नरेंद्र पाटील यांनी साताऱ्यात माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
महत्वाच्या घडामोडी –
“पंतप्रधान मोदीसाहेब, बंगाल मधील पराभवाचा राग पेट्रोल डिझेलवर का काढताय?”
ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल आणि इंग्लंड विरूद्धच्या सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा
“शरद पवार मराठा आरक्षण देऊ शकले नाहीत, फडणवीसांनी ते दिले, तेही सरकारला टिकवता आले नाही”