पुणे : मराठा आरक्षणावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार टीका होत आहे. अशातच माजी खासदार तसेच भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष संजय काकडे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.
तीन वेळा मुख्यमंत्री राहिलेले आणि 50 वर्षांची राजकीय कारकीर्द असलेले शरद पवारही मराठा समाजाला आरक्षण देऊ शकले नाहीत. ते आरक्षण देवेंद्र फडणवीस यांनी देण्याची हिम्मत दाखवली ते सुद्धा या सरकारला टिकवता आलं नाही, असा हल्लाबोल संजय काकडे यांनी यावेळी केला.
शरद पवार मराठा नेते म्हणून पश्चिम महाराष्ट्रातून ते उदयास आले. मराठ्यांसाठी काहीतरी करतील अशी समाजाला आशा होती. पण त्यांनाही आरक्षण देता आले नाही. कोकण, विदर्भ, मराठवाड्यात राष्ट्रवादी आहे कुठे असा प्रश्नही काकडेंनी यावेळी उपस्थित केला.
दरम्यान, संजय काकडे यांची काल भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यात ते बोलत होते.
महत्वाच्या घडामोडी –
आंतरराष्ट्रीय मदतीतही मोदी सरकारचा महाराष्ट्राशी भेदभाव- सचिन सावंत
“ज्या पतीला वाचवण्यासाठी लता करे अनवाणी धावल्या, त्या पतीला कोरोनानं हिरावलं”
“उद्धव ठाकरेंची महाविकास आघाडीत घुसमट होत आहे, आज ना उद्या ते नक्की आघाडीतून बाहेर पडतील”
“आरोग्य विभागात भरती करण्याचा निर्णय आता घेतला जातोय, वर्षभर ठाकरे सरकार झोप काढत होतं का?”