मुंबई : कोरोना रूग्णांची वाढती लोकसंख्या आणि त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर येणार भार लक्षात घेऊन आरोग्य विभागातील 100 टक्के पदभरतीला मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे विविध संवर्गातील 16 हजार पदे तातडीने भरण्यात येतील, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. यावर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
कोविडचे संकट येऊन आता वर्षभरापेक्षा जास्त काळ झाला, राज्यात परराज्यातून डॉक्टर मागवण्याची वेळ आली होती. परंतु आरोग्य विभागात भरती करण्याचा निर्णय आता घेतला जातोय. वर्षभर ठाकरे सरकार झोप काढत होतं, याचा दुसरा पुरावा कशाला हवाय?, असं ट्विट करत अतुल भातखळकरांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
कोविडचे संकट येऊन आता वर्षभरापेक्षा जास्त काळ झाला, राज्यात परराज्यातून डॉक्टर मागवण्याची वेळ आली होती. परंतु आरोग्य विभागात भरती करण्याचा निर्णय आता घेतला जातोय. वर्षभर ठाकरे सरकार झोप काढत होतं, याचा दुसरा पुरावा कशाला हवाय? pic.twitter.com/t6Oclzwqa1
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) May 7, 2021
महत्वाच्या घडामोडी –
“अशोक चव्हाणांना कायदा कळत नाही, त्यामुळे ते मराठा आरक्षणाच्या बाबतीत वेड पांघरून पेडगावला जात आहे”
“मराठा समाजाला कळून चुकलंय की, आरक्षणाच्या निर्णयाला पूर्णपणे महाविकास आघाडी जबाबदार”
अवघा देश बुडेल, असे यांचे महाराष्ट्र मॉडेल; अतुल भातखळकरांचा टोला
संज्या राऊतला अधिकार काय मराठा समाजाच्या विषयावर बोलण्याचा?; निलेश राणेंचा हल्लाबोल