मुंबई : मराठा समाजाला कळून चुकलंय की, आरक्षणाबाबत मा. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला पूर्णपणे महाविकास आघाडी जबाबदार आहे., असं वक्तव्य भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी केलं आहे. यासंदर्भात प्रवीण दरेकर यांनी ट्विट केलं आहे.
मराठा समाजातले तरूण-तरूणी, विद्यार्थी सुरक्षित आहेत आणि बऱ्यापैकी सर्वार्थानं समज आणि जाण असणारा हा समाज आहे. मग त्यावेळी आम्ही म्हणायचं का आम्ही देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्या समाजाचे माती भडकण्याचे काम केलं. त्या समाजामध्ये फूस लावून त्या ठिकाणी प्रक्षोभक वातावरण तयार होईल अशा प्रकारचं बोललो का आम्ही तुम्हाला? आता सगळं काही आपल्या हातातनं गेलंय. मराठा समाजाला पूर्णपणे कळून चुकलंय की, याला जबाबदार पूर्णपणे महाविकास आघाडी सरकार आहे. आणि तो संताप, तो उद्रेक, तो असंतोष आता क्षमवण्यासाठी या ठिकाणी अशा प्रकारची वक्तव्ये केली जात आहेत., असं प्रवीण दरेकरांनी यावेळी म्हटलं.
कोरोनाचा संकट काळ आहे म्हणून मराठा समाजाचा आज या ठिकाणी संयम आहे. तो संयम राहावा, असा आमचंही आवाहन आहे. कारण कोरोनाच्या परिस्थितीमध्ये अशांतता होऊ नये, वातावरण निर्माण होऊ नये ही आमची भूमिका आहे, परंतु मराठा समाजामध्ये निश्चितपणे महाविकास आघाडी सरकार संदर्भात रोष आहे. आणि त्या रोषाप्रती आज माथी भडकावू नका, असं करू नका, या भितीपोटी, भयापोटी अशा प्रकारे चव्हाण आणि बाकीच्यांची वक्तव्ये येताना दिसत आहेत, असं प्रवीण दरेकर म्हणाले.
मराठा समाजाला कळून चुकलंय की, आरक्षणाबाबत मा. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला पूर्णपणे महाविकास आघाडी जबाबदार आहे.
@BJP4Maharashtra pic.twitter.com/lrMNr16MDn— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) May 6, 2021
महत्वाच्या घडामोडी –
अवघा देश बुडेल, असे यांचे महाराष्ट्र मॉडेल; अतुल भातखळकरांचा टोला
संज्या राऊतला अधिकार काय मराठा समाजाच्या विषयावर बोलण्याचा?; निलेश राणेंचा हल्लाबोल
मराठा समाजाचं ठरलं! 16 तारखेपासून पुन्हा मोर्चा काढणार; ‘या’ ठिकाणी होणार पहिला मोर्चा
“मराठा समाजाच्या भवितव्याशी खेळणं आता सरकारनं आता बंद केलं पाहिजे”