मुंबई : सर्वोच्च न्यायालयाकडून मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया देत केेंद्र सरकारवर टीका केली आहे.
सुप्रीम कोर्टाचा निर्णय अनाकलनीय आणि दुर्देवी असल्याचं म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी खोटं बोलून मराठा समाजाची फसवणूक केल्याचं स्पष्ट झालं आहे. या खटल्यात मोदी सरकारची भूमिका संदिग्ध होती. मराठा समाजाला आरक्षण मिळू नये हीच मोदी सरकारची इच्छा होती का? असा प्रश्न नाना पटोले यांनी यावेळी उपस्थित केला. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
दरम्यान, उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये बाजू मांडण्यासाठी वकीलही फडणवीस यांनीच नेमले असं असताना आणि 102 व्या घटना दुरुस्तीचा अडथळा मोदी सरकारने आणलेला असताना देवेंद्र फडणवीस त्यांच्या स्वतः च्या आणि मोदी सरकारच्या कर्माची जबाबदारी राज्य सरकारवर कशी टाकू शकतात? असा सवाल करत फडणवीसांनी खोटं बोलून मराठा समाजाच्या लोकांची माथी भडकवण्याचे उद्योग बंद करावेत, असंही नाना पटोले यांनी म्हटलं.
महत्वाच्या घडामोडी –
मराठा आरक्षण रद्द होण्याचे पाप मोदी सरकारने निस्तारावे- सचिन सावंत
मराठा आरक्षण नाकारले जाणे हे पूर्णपणे महाविकास आघाडी सरकारचे अपयश- चंद्रकांत पाटील
“राजेश टोपे जालन्याचे आरोग्य मंत्री आहेत की महाराष्ट्राचे?”
“मराठा समाजाला आरक्षण मिळूच नये याची पुरेपूर काळजी ठाकरे सरकारने घेतली”