मुंबई : पश्चिम बंगाल विधानसभेचा निकाल 2 मे रोजी जाहीर झाला. यानंतर बंगालमध्ये हिंसा उसळली होती. या हिंसाचाराविरोधात भाजपकडून बुधवारी निदर्शनं करण्यात येणार आहे. महाराष्ट्र भाजपकडूनही उद्या राज्यभरात निदर्शन करण्यात येणार असल्याची घोषणा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलीय.
‘पश्चिम बंगालमध्ये निकालानंतर सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राज्यभर हिंसाचार सुरु केला असून भाजपा कार्यकर्त्यांचे खून करण्यात येत आहेत. या राजकीय हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी भाजपाचे कार्यकर्ते उद्या राज्यभर ठिकठिकाणी निदर्शनं करणार अशी माहिती भाजपा अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.
दरम्यान, भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी याबाबत माहिती दिली आहे.
#WestBengalElections निकालानंतर सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राज्यभर हिंसाचार सुरू केला असून भाजपा कार्यकर्त्यांचे खून करण्यात येत आहेत. या राजकीय हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी भाजपाचे कार्यकर्ते उद्या राज्यभर ठिकठिकाणी निदर्शने करणार @ChDadaPatil यांची माहिती
— Keshav Upadhye (@keshavupadhye) May 4, 2021
महत्वाच्या घडामोडी –
…म्हणून कंगणा राणावतला झाले अश्रू अनावर; पहा व्हिडीओ
कोरोना लसींप्रकरणी प्रकाश जावडेकरांचा खोटारडेपणा उघड, महाराष्ट्राची माफी मागा- सचिन सावंत
कोल्हापूरमध्ये 10 दिवसांचा कडक लाॅकडाऊन; पालकमंत्री सतेज पाटील यांची घोषणा
“…तर लोकशाही संपली असं जाहीर करा”; नवाब मलिकांची चंद्रकांत पाटलांवर टीका