पश्चिम बंगाल विधानसभेचा निकाल 2 मे रोजी जाहीर झाला. यानंतर बंगालमध्ये हिंसा उसळली होती. अनेक जणांनी या हिंसाचाराची निंदा केली आहे. यात आता बॉलिवूड अभिनेत्री कंगणा राणावतने एक व्हिडीओ शेअर करत आपल्या भावना प्रकट केल्या आहेत. यात बोलताना कंगना राणावतला अश्रू अनावर झाले.
आपण सर्वजण बघतोय की बंगालमधून खूप जास्त डिस्टर्ब करणाऱ्या बातम्या येत आहेत. याबाबत व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत आहेत. खुलेआम बंगालमध्ये खून आणि बलात्कार होत आहेत. त्यातच आता घरला देखील जाळलं जात आहे. यावर कोणीही लिबरल माध्यमे काहीच बोलत नाहीत, कोणत्याही आंतरराष्ट्रीय पातळीवरचे माध्यमे याला कवर करत नाहीत. मला समजत नाहीय की ही लोकं आपल्या भारतासोबत काय करण्याचा प्रयत्न करत आहेत. हिंदू रक्त इतकं स्वस्त आहे का?, असं म्हणत कंगणा राणावतने प्रश्न उपस्थित केला आहे.
बंगालमध्ये हिंसाचार होत आहे. रक्ताच्या नद्या वाहत आहेत. आपण का या देशद्रोहाना घाबरतो. आता देशद्रोही देश चालवणार का?, मला माहिती आपण खूप अडचणी सापडलो आहोत. या वेळी देशात राष्ट्रपती राजवट लावण्याची गरज आहे, असं कंगणा राणावत म्हणाली आहे.
जवाहरलाल नेहरुंनी देशात 12 वेळा राष्ट्रपती राजवट लावली. इंदिया गांधींनी 50 वेळा राष्ट्रपती राजवट लावली होती. तर मग आपण का घाबरत आहोत, असंही कंगणा राणावतने म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
कोरोना लसींप्रकरणी प्रकाश जावडेकरांचा खोटारडेपणा उघड, महाराष्ट्राची माफी मागा- सचिन सावंत
कोल्हापूरमध्ये 10 दिवसांचा कडक लाॅकडाऊन; पालकमंत्री सतेज पाटील यांची घोषणा
“…तर लोकशाही संपली असं जाहीर करा”; नवाब मलिकांची चंद्रकांत पाटलांवर टीका
बंगालमध्ये वाघीण जिंकली म्हणणारे, हिंसाचाराच्या घटनेवर मुग गिळून गप्प- प्रवीण दरेकर