Home महाराष्ट्र कोल्हापूरमध्ये 10 दिवसांचा कडक लाॅकडाऊन; पालकमंत्री सतेज पाटील यांची घोषणा

कोल्हापूरमध्ये 10 दिवसांचा कडक लाॅकडाऊन; पालकमंत्री सतेज पाटील यांची घोषणा

कोल्हापूर : वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्यात अंशत: लाॅकडाऊन जाहीर करूनही कोरोना रूग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. तसेच कोरोना मृतांची संख्याही वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर आता सांगलीपाठोपाठ कोल्हापूरमध्येही कडक लाॅकडाऊनची घोषणा कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी केली.

राज्यातील रुग्णवाढीचा आलेख कायम असून, 50 ते 60 हजारांच्या दरम्यान राज्यात रुग्णवाढ होत आहे. यात काही जिल्ह्यांतील परिस्थिती अजून चिंताजनक आहे. जिल्ह्यात वाढती कोरोना रूग्णसंख्या पाहता बुधवारपासून (5 मे) पुढील 10 दिवस कडकडीत टाळेबंदी पाळण्याचा निर्णय आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

दरम्यान, या बैठकीत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर हे सहभागी झाले होते. या बैठकीत हा लाॅकडाऊनचा निर्णय घेण्यात आला.

महत्वाच्या घडामोडी –

“…तर लोकशाही संपली असं जाहीर करा”; नवाब मलिकांची चंद्रकांत पाटलांवर टीका

बंगालमध्ये वाघीण जिंकली म्हणणारे, हिंसाचाराच्या घटनेवर मुग गिळून गप्प- प्रवीण दरेकर

सांगलीत उद्या मध्यरात्रीपासून कडक लाॅकडाऊन; पालकमंत्री जयंत पाटील यांची घोषणा

“चंद्रकांत पाटील यांनी छगन भुजबळांची तात्काळ माफी मागावी”