मुंबई : पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांनी विजयाची हॅट्रिक पूर्ण केली. बंगालमध्यमध्ये तृणमूलने 292 जागांपैकी तब्बल 214 जागांवर बाजी मारत विजय मिळवला. यानंतर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया देत भाजपवर टीका केली होती. यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया देत छगन भुजबळांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
छगन भुजबळांनी पंढरपूरवर प्रतिक्रिया द्यावी, जामिनावर सुटलेला आहात, तुम्ही निर्दोष सुटलेले नाहीत. त्यामुळं तुम्ही फार जोरात बोलू नका अन्यथा फार महागात पडेल. बोलायचं असेल पंढरपूर, आसाम, पुद्दुचेरीवर बोला, असा हल्लाबोल चंद्रकांत पाटलांनी यावेळी केला. आता यावर राष्ट्रवादीचे नेते व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया देत चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधला आहे.
ममता दिदिंनी संघर्ष करुन पश्चिम बंगालमध्ये विजय मिळवला. ‘मेरा पश्चिम बंगाल मैं नही दूंगी’ असं म्हणत जखमी झालेली महिला देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री प्रचारात उतरलेले असतानाही त्यांनी विजय मिळवला, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करणारी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिलेली होती. यावरुन चंद्रकांत पाटलांना राग येण्याची गरज नव्हती., असं मुश्रीफ म्हणाले.
भुजबळ तुम्ही जामिनावर आहात, तुम्ही निर्दोष सुटलेला नाहीत. अन्यथा तुमचा जामिन रद्द करु, अशा आशयाची प्रतिक्रिया देताना आज भारतीय जनता पक्षाच्या हातात ईडी, सीबीआय, एनआयए आहे. आता कोर्टही यांच्या खिशात असल्यासारखं ही मंडळी बोलू लागली आहेत, असं मुश्रीफ यांनी यावेळी म्हटलं.
दरम्यान, चंद्रकांत पाटलांनी तत्काळ आमचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची माफी मागावी. त्यांच्या बोलण्याचा जो रोख होतो, जो गर्व होता, तो जनता सहन करणार नाही, त्यामुळे त्यांनी तत्काळ भुजबळांची माफी मागावी, असंही मुश्रीफ यावेळी म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी –
तुम्ही सांगाल ते करायला न्यायदेवता म्हणजे सीबीआय, ईडी नाही; भुजबळांचा पलटवार
“…तर भाजप महाराष्ट्रात दुर्बिण घेऊन शोधला असता तरी सापडला नसता”
“साताऱ्यात आज रात्रीपासून कडक लाॅकडाऊन”
“भाजपाचे राज्य म्हणजे गाढवांचा गोंधळ आणि लाथांचा सुकाळ”