Home पुणे …त्यामुळे चंद्रकांत पाटलांनी मग्रूरपणे बोलू नये- रुपाली चाकणकर

…त्यामुळे चंद्रकांत पाटलांनी मग्रूरपणे बोलू नये- रुपाली चाकणकर

पुणे : छगन भुजबळांनी पंढरपूरवर प्रतिक्रिया द्यावी, जामिनावर सुटलेला आहात, तुम्ही निर्दोष सुटलेले नाहीत. त्यामुळं तुम्ही फार जोरात बोलू नका अन्यथा फार महागात पडेल, असं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांना केलं होतं. त्याला राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

चंद्रकांत पाटील यांना स्वत:च्या गावात ग्रामपंचायत निवडून आणता आली नाही. कोल्हापुरात त्यांना महापौर बसवता आला नाही. या दैदिप्यमान कामगिरीमुळेच तुम्हाला कोल्हापूर सोडून पुण्यातील एका महिलेचा सुरक्षित मतदारसंघ निवडावा लागला, असं म्हणत रुपाली चाकणकर यांनी चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधलाय.

चंद्रकांत पाटील यांना कोरोनाच्या संकटाशी काहीही देणघेणं नाही. ‘याला महागात पडेल’, ‘त्याला बघून घेऊ’, ‘त्याच्यावर गुन्हा दाखल करा’, ‘त्याला आत टाका’, अशा विषयांवर पीएचडी पूर्ण करुन चंद्रकांतदादा M.Phil करत आहेत. छगन भुजबळ हे जामिनावर बाहेर आहेत, असं वक्तव्य त्यांनी केलं. मात्र, चंद्रकांतदादांनी आपल्या आजुबाजूला पाहिले तर भाजपमधील अनेक नेतेही जामिनावरच बाहेर आहेत, हे त्त्यांच्या लक्षात येईल. त्यामुळे चंद्रकांत पाटलांनी इतरांशी मग्रूरपणे बोलू नये, असं रुपाली चाकणकर म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी –

‘आयपीएल’वर कोरोनाचं सावट! KKR चे 2 खेळाडू पाॅझिटिव्ह; आजचा सामना पुढे ढकलला

“तुम्ही जामिनावर सुटलेला आहात, जोरात बोलू नका अन्यथा महागात पडेल”

“भारतनाना माफ करा, तुमच्या प्रामाणिकसेवेला पैशाने हरविले”

पंढरपूर पोटनिवडणूक निकालानंतर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…