मुंबई : पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांनी विजयाची हॅट्रिक पूर्ण केली. बंगालमध्यमध्ये तृणमूलने 292 जागांपैकी तब्बल 214 जागांवर बाजी मारत विजय मिळवला. यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ट्विट करत ममता बॅनर्जींचं अभिनंदन केलं आहे.
ममता बॅनर्जी या ‘बंगाली’ जनतेच्या स्वाभिमानाचा लढा एकाकी लढत होत्या. त्यांच्या हिंमतीला दाद द्यावील लागेल. अखेर त्यांचा विजय झालाच आहे. या विजयाचे संपू्र्ण श्रेय या बंगालच्या वाघिणीलाच द्यावं लागेल. पंतप्रधानांपासून गृहमंत्र्यांपर्यंत संपूर्ण केंद्र सरकार, राज्यांची सरकारे ममता दीदींच्या पराभवासाठी प.बंगालच्या भूमीवर एकवटली. त्या सर्व शक्तींची घूळदाण उडवत ममता दीदींनी विजय मिळवला. मी त्यांचे आणि हिंमतबाज प.बंगाली जनतेचे मनापासून अभिनंदन करतो. आता राजकारण संपले असेल तर सगळ्यांनी मिळून कोरोनाविरूद्धच्या लढाईमध्ये लक्ष देऊया., असं उद्धव ठाकरेंनी ट्विटमध्ये म्हटलं.
ममता दीदी आणि प. बंगालमधील जनतेचे मनापासून अभिनंदन!@MamataOfficial pic.twitter.com/KE9VYvNNru
— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) May 2, 2021
महत्वाच्या घडामोडी –
“त्या अजित पवारांना शोधा, तुमच्या घरात शिरून बीजेपी ने तुम्हाला ठोकलंय”
गड आला पण सिंह गेला; नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जींना पराभवाचा धक्का
पंढरपूरमध्ये राष्ट्रवादीला पराभवाचा धक्का; भाजपच्या समाधान अवतावडेंनी मिळवला विजय
नंदीग्राममध्ये अटीतटीच्या लढाईत ममता दिदींनी मारलं मैदान, 1200 मतांनी मिळवला विजय