Home देश गड आला पण सिंह गेला; नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जींना पराभवाचा धक्का

गड आला पण सिंह गेला; नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जींना पराभवाचा धक्का

कोलकाता : पश्चिम बंगालची विधानसभा निवडणूक मोठ्या धामधुमीत पार पडल्यानंतर नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जींना मोठा धक्का बसला. नंदीग्राम विधानसभा मतदारसंघाची लढाई ममता बॅनर्जी हारल्या आहेत.

एकेकाळचे सहकारी सुवेंद्र अधिकारी यांनी ममता बॅनर्जी यांचा पराभव केला आहे. शेवटपर्यंत रोमांचक ठरलेल्या या लढतीत भाजप उमेद्वार सुवेंद्र अधिकारी यांनी ममता बॅनर्जी यांचा 1622 मतांनी पराभव करत विजय मिळवला आहे.

ममतांनीही पत्रकार परिषदेत नंदीग्राममधील त्यांचा पराभव मान्य केला. नंदीग्रामबद्दल काळजी करू नका, मी नंदीग्रामसाठी संघर्ष केला, कारण मी एक चळवळ लढविली. पण ठीक आहे. नंदीग्राम लोकांना जे हवे ते निकाल द्या, ते मी स्वीकारते. मला हरकत नाही. आम्ही 221 पेक्षा जास्त जागा जिंकल्या आणि भाजप निवडणूक हरला, असं ममता बॅनर्जीं म्हणाल्या.

महत्वाच्या घडामोडी –

पंढरपूरमध्ये राष्ट्रवादीला पराभवाचा धक्का; भाजपच्या समाधान अवतावडेंनी मिळवला विजय

नंदीग्राममध्ये अटीतटीच्या लढाईत ममता दिदींनी मारलं मैदान, 1200 मतांनी मिळवला विजय

“बेळगावात काँग्रेस उमेद्वार आघाडीवर”

पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुक 2021! राष्ट्रवादीचे भगीरथ भालके ‘इतक्या’ मतांनी आघाडीवर