मुंबई : वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यात लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला. कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उद्धव ठाकरेंनी बैठक घेतली होती. या बैठकीमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केेलेली एक मागणी उद्धव ठाकरेंनी मान्य केली आहे.
परराज्यातून येणाऱ्यां मजूरांची नोंदणी ठेवा, अशी मागणी राज ठाकरे यांनी राज्य सरकारकडे केली होती. मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेआधी तसं काही झालं नाही. आता कोरोनाची दुसरी लाट आली असून मोठ्या प्रमाणात नुकसान झालंं आहे.
दरम्यान, कोरोनाची ही लाट ओसरल्यावर मजुर पुन्हा येतील. याच पार्श्वभूमीवर आपल्याकडे संसर्गाचा जोर कमी होईल. तसे हे मजूर परतायला सुरुवात होईल मात्र ते आपल्याबरोबर संसर्ग आणत नाहीत ना याची काळजी घ्यावी लागेल, असं उद्धव ठाकरेे यावेळी म्हणाले. तसेच या साथीला रोखण्यासाठी आपण जो प्रयत्न करतोय ते वाया जातील. यासाठी मजुरांची व्यवस्थित नोंद उद्योग-व्यवसाय, कंत्राटदारांकडून व ठेकेदारांकडून वेळेतच घ्यावी, जेणे करून त्यांच्या चाचण्या, विलगीकरण याबाबत ठरवता येईल, असंही उद्धव ठाकरेंनी यावेळी स्पष्ट केलं.
महत्वाच्या घडामोडी –
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी सांगा गरिबांनी जगायचं कस?; भाजपचा सवाल
“युतीत असताना स्व. बाळासाहेब ठाकरे तुमच्यासाठी हिंदुहृदयसम्राट होते, आता ते फक्त उद्धवजींचे वडील?”
“खिशात आणा नसताना बाजीराव बनण्याचं सोंग पाकिस्ताननं का करावं?”