मुंबई : देश कोरोना संकटाला तोंड देत असतानाच नवीन संसद भवनाचं काम केंद्राकडून सुरू ठेवण्यात आलं आहे. त्यावरून राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी नव्या संसद भवनावरून टीका केली होती. सध्या देशाची प्राथमिकता काय याचा पुनर्विचार होणं गरजेचं आहे. नागरिकांचं लसीकरण होणं गरजेचं असताना राज्य आर्थिक भार उचलत आहेत, तर केंद्र सरकार नवीन संसद भवन प्रकल्पाचा भार उचलत असून, हे अपेक्षित नाही आणि योग्यही नाही असं रोहित पवार म्हणाले. यावर भाजप नेते अतुल भातखळकर यांनी उत्तर दिलं.
मुख्यमंत्री 400 कोटी रुपये खर्चून वडिलांचे स्मारक उभरताय, त्यांना हा प्रश्न विचारा रोहित पवारजी. आपल्या गृहमंत्र्याने फ़क्त मुंबईतून केलेली वसूली दीड हजार कोटी आहे म्हणतात, ती रक्कम लसीकरणासाठी वळवा म्हणतो मी., असं भातळखळकर म्हणाले होते. यावर आता रोहित पवार यांनी प्रतिक्रिया देत बाळासाहेब ठाकरेंच्या नावावरून भातखळकरांना टोला लगावला आहे.
युतीत असताना स्व. बाळासाहेब ठाकरे तुमच्यासाठी हिंदुहृदयसम्राट होते, आता ते फक्त उद्धवजींचे वडील? विचार करणारा चेहरा, भावना आणि भूमिका सत्तेच्या पलीकडील असतात, असं ऐकलं होतं. परंतु आपल्या भावना सत्ता जाताच बदलल्या. अशी सोयीस्कर भूमिका बदलावी तर तुम्हीच, असं ट्विट करत रोहित पवारांनी भातखळकरांवर हल्लाबोल केला आहे.
युतीत असताना स्व. बाळासाहेब ठाकरे तुमच्यासाठी हिंदुहृदयसम्राट होते, आता ते फक्त उद्धवजींचे वडील? भावना आणि भूमिका सत्तेच्या पलीकडील असतात, असं ऐकलं होतं. परंतु आपल्या भावना सत्ता जाताच बदलल्या. अशी सोयीस्कर भूमिका बदलावी तर तुम्हीच. https://t.co/lbtj30GEWr
— Rohit Pawar (@RRPSpeaks) April 29, 2021
महत्वाच्या घडामोडी –
“खिशात आणा नसताना बाजीराव बनण्याचं सोंग पाकिस्ताननं का करावं?”
तू कोट्यवधींची मालकीण आहेस तर देशसेवेसाठी खर्च कर; राखी सावंतचा कंगणाला सल्ला
क्विंटन डी कॉकची दमदार खेळी; मुंबईचा राजस्थानवर 7 विकेट्सने विजय