मुंबई : शिवसेनेचं मुखपत्र असेलल्या सामना अग्रलेखातून पाकिस्तानातील गव्हाचा साठ्याबद्दल भाष्य करण्यात आलं आहे.
पाकिस्तानात इम्रान खान यांचं सरकार सत्तेवर आल्यापासून पाकिस्तानात आर्थिक अराजक पसरले आहे. इम्रान खान यातून मार्ग काढतीलही, पण खिशात आणा नसताना बाजीराव बनण्याचे सोंग पाकिस्तानने का करावं? असा प्रश्न सामना अग्रलेखात करण्यात आला आहे.
पंतप्रधान इम्रान खान यांना हातात कटोरा घेऊन पुनः पुन्हा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीपासून अमेरिका आणि चीनच्या दारात जावं लागत आहे. त्यात गव्हाच्या टंचाईचे अभूतपूर्व संकट पाकिस्तानसमोर उभे ठाकले आहे. इम्रान खान यातून मार्ग काढतीलही, पण खिशात आणा नसताना बाजीराव बनण्याचे सोंग पाकिस्ताननं का करावं, हा प्रश्न उरतोच! अशी टीका सामना अग्रलेखातून केली आहे.
दरम्यान, खायला नाही दाणा अन् मला बाजीराव म्हणा, अशी आपल्याकडे एक म्हण आहे. आपला शेजारी देश असलेल्या पाकिस्तानला ही म्हण अगदी तंतोतंत लागू पडते. कमालीचे दारिद्रय, भुकेकंगाल जनता, महागाईचा आगडोंब, कर्जात आकंठ बुडालेला देश आणि जर्जर झालेली अर्थव्यवस्था हे पाकिस्तानचे वास्तवदर्शी रूप आहे. मात्र तरीही आम्ही अण्वस्त्रसज्ज देश आहोत असा तोरा हा देश कायम मिरवत असतो. पाकिस्तानचा हा दिमाख बेगडी आहे हे आता जगापासून लपून राहिलेले नाही, असा उपरोधक टोलाही सामनातून लगावण्यात आला.
महत्वाच्या घडामोडी –
तू कोट्यवधींची मालकीण आहेस तर देशसेवेसाठी खर्च कर; राखी सावंतचा कंगणाला सल्ला
क्विंटन डी कॉकची दमदार खेळी; मुंबईचा राजस्थानवर 7 विकेट्सने विजय
माजी पंतप्रधान डाॅ.मनमोहन सिंग यांची कोरोनावर मात; एम्स रूग्णालयातून दिला डिस्चार्ज
“पोलिसांना धमकावल्याप्रकरणी देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकरांवर गुन्हा दाखल करा”