मुंबई : स्वराज्यरक्षक संभाजी मालिका राष्ट्रवादीच्या धोरणाला धरुन नसल्याने मालिका थांबवनार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सोशल मिडीयावर चालू आहेत. यावर राष्टवादीचे नेते आणि संभाजी मालिकेतील प्रमुख अभिनेते अमोल कोल्हे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
गेले काही दिवस स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेसंदर्भात कोणतीही शहानिशा न करता कपोलकल्पित माहितीच्या आधारे सोशल मीडिया वर अफवा फिरवण्याचा प्रयत्न केला जातोय प्रेक्षक म्हणून आपल्याला मत व्यक्त करण्याचा अधिकार आहेच पण मालिका अजून पूर्णत्वाला गेलेली नसताना अपप्रचार करणे योग्य नाही, असं ट्विट अमोल कोल्हे यांनी केलं आहे.
गेले काही दिवस स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेसंदर्भात कोणतीही शहानिशा न करता कपोलकल्पित माहितीच्या आधारे सोशल मीडिया वर अफवा फिरवण्याचा प्रयत्न केला जातोय
प्रेक्षक म्हणून आपल्याला मत व्यक्त करण्याचा अधिकार आहेच पण मालिका अजून पूर्णत्वाला गेलेली नसताना अपप्रचार करणे योग्य नाही. pic.twitter.com/bpA8bNhHti
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) February 5, 2020
स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेसंदर्भात शरद पवार यांना गोवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याचा मी निषेध करतो, मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सक्रिय झाल्यापासून शरद पवार यांनी मालिकेत हे दाखवा, हे दाखवू नका. असं कधीही सांगितलं नाही, असं अमोल कोल्हे म्हणाले आहेत.
दरम्यान, कोणाच्या दबावामुळे ही मालिका बंद होते. अश्या बातम्या जे कोणी फिरवण्याचा प्रयत्न करतंय त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी मी महाराष्ट्र पोलिसांकडे आणि मुख्यमंत्र्यांकडे केली आहे, असंही अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे.
अर्धवट चुकीच्या माहितीच्या आधारे स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेसंदर्भात अनेक पोस्ट्स फिरत आहेत. या पोस्ट्स सोशल मिडियावर पसरविणाऱ्यांनी मालिका संपूर्ण पहावी आणि मग प्रेक्षक या नात्याने जरूर टिप्पणी करावी..
मालिका रोज रात्री ९ वाजता झी मराठी वाहिनीवर सुरू आहे याची नोंद घ्यावी! pic.twitter.com/0TL6ea6913— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) February 5, 2020
महत्वाच्या घडामोडी-
लाज वाटायला हवी तुम्हाला; अभिनेते प्रकाश राज भाजपवर कडाडले
भाजपचा ‘हा’ नेता म्हणतो, मुख्यमंत्र्यांमुळे महाराष्ट्राच्या प्रतिमेला धक्का बसलाय
त्यांनी जर मनात आणलं तर यांना मुंबईत फिरणं अशक्य होईल; जयंत पाटलांचा आशिष शेलारांना टोला
तुमच्यासारखे व्हिलन असतील तर त्यांचा सुपडा साप करायला वेळ लागणार नाही- रुपाली चाकणकर