मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर हजारो कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात आला. यानंतर आता परमबीर सिंग यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे.
परमबीर सिंग यांच्यासह 27 पोलिस अधिकाऱ्यांविरोधात अकोल्यातील शहर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी रात्री उशिरा अॅट्रॉसिटी कायद्यासह विविध 22 कलमान्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक भिमराज घाडगे यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठाणे शहर पोलीस आयुक्तपदी असताना परमबीर सिंग यांनी हजारो कोटींचा भ्रष्टाचार केल्याचे पत्र वरिष्ठ पोलीस निरीक्षक भिमराज घाडगे यांनी मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांसह विविध यंत्रणेकडे दिलं आहे. आता त्यांनी परमबीर सिंग यांच्यावर जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप लावला आहे.
दरम्यान, या तक्रारीवरून शहर कोतवाली पोलिसांनी परमबीर सिंग यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मुंबई व ठाण्याचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यासह तब्बल 27 पोलिस अधिकाऱ्यांविरुद्ध अॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महत्वाच्या घडामोडी –
“पंकजाताई होणाऱ्या त्रासाची मला जाणीव, मोठा भाऊ म्हणून मी सोबत आहे”; धनंजय मुंडेची फेसबुक पोस्ट
केंद्राने करोनाला राष्ट्रीय आपत्ती घोषित करावं; संजय राऊत यांची मागणी