Home महाराष्ट्र केंद्राने करोनाला राष्ट्रीय आपत्ती घोषित करावं; संजय राऊत यांची मागणी

केंद्राने करोनाला राष्ट्रीय आपत्ती घोषित करावं; संजय राऊत यांची मागणी

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने कोरोना महामारी ही राष्ट्रीय आपत्तीच आहे, असं म्हटलं आहे. आजची परिस्थिती हे राष्ट्रीय संकटच आहे. त्यामुळे केंद्र सरकारने आता कोरोना महामारी राष्ट्रीय आपत्ती जाहीर करावी, अशी मागणी शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली. ते आज प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सुरुवातीपासूनच सांगत होते की करोनाला राष्ट्रीय आपत्ती घोषित करा. त्यांनी गृहमंत्री, पंतप्रधान यांच्याकडे तशी मागणीही केली होती. मात्र त्याला कोणी प्रतिसाद दिला नाही. आता सर्वोच्च न्यायालयाने तेच म्हटलं आहे, असं संजय राऊत म्हणाले.

कोरोनाच्या संकटामुळे सर्वोच्च न्यायालय आणि हायकोर्ट अॅक्टिव्ह झालं आहे. कोरोना कोर्टापर्यंतही पोहोचला आहे. मला वाटत त्यांच्या घरापर्यंत कोरोना गेला आहे. कोर्ट झालंय, त्यामुळे देशाला नक्कीच काही ना काही फायदा होईल, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला.

महत्वाच्या घडामोडी –

माझं वर्षभराचं मानधन राज्यासाठी देणार- बाळासाहेब थोरात

“भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना कोरोनाची लागण”

धक्कादायक!”…अन् त्याच्यावर आईचा मृतदेह बाईकवरुन स्मशानात नेण्याची वेळ”

धोनी ब्रिगेडची विजयी घोडदौड; चेन्नईचा हैदराबादवर 7 विकेट्सने विजय