दिल्ली : IPL 2021 हंगामातील 23 वा सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघात झाला. या सामन्यात चेन्नईने 7 विकेट्सने विजय मिळवला.
हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 3 बाद 171 धावा करत चेन्नईला 172 धावांचं आव्हान दिलं. या आव्हानाचा पाठला चेन्नईने 18.3 षटकात 3 विकेट्स गमावत विजय मिळवला.
हैदराबादने दिलेल्या 172 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी चेन्नईकडून ऋतुराज गायकवाड आणि फाफ डू प्लेसिस यांनी दमदार सुरुवात केली. या दोघांनीही शतकी भागीदारी करताना वैयक्तिक अर्धशतकेही पूर्ण केली.
राशिद खान ने 13 व्या षटकात ऋतुराजाचा त्रिफळाचीत केला. त्यानंतर मोईन अली 15 व्या षटकात राशिद खानच्या गोलंदाजीवर 15 धावा करुन बाद झाला. त्याला राशिद खानने बाद केले. त्याच्या पुढच्याच चेंडूवर राशिदने फाफ डू प्लेसिसला पायचीत केले. फाफ डू प्लेसिस 15 व्या षटकात 38 चेंडूत 56 धावांवर बाद झाला.
अखेर सुरेश रैना आणि रविंद्र जडेजाने उर्वरित आव्हान पूर्ण करत चेन्नईच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. रैना 17 धावांवर तर जडेजा 7 धावांवर नाबाद राहिला.
दरम्यान, हैदराबादकडून केवळ राशिद खानलाच विकेट्स घेण्यात यश आले. चेन्नईच्या सर्व ३ विकेट्स त्यानेच घेतल्या.
महत्वाच्या घडामोडी –
“गिरीश भाऊंना राजकारणात मी आणलं, म्हणून आज गिरीश भाऊ दिसत आहेत”
“राज्यात 15 मे पर्यंत लाॅकडाऊन वाढवला”
हे कोरोनाचे कमी आणि व्यवस्थेचे बळी जास्त- चित्रा वाघ