Home जळगाव “गिरीश भाऊंना राजकारणात मी आणलं, म्हणून आज गिरीश भाऊ दिसत आहेत”

“गिरीश भाऊंना राजकारणात मी आणलं, म्हणून आज गिरीश भाऊ दिसत आहेत”

जळगाव : राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या दूरध्वनीवरील संभाषणाची एक ऑडिओ क्लीप सध्या व्हायरल झाली आहे. या क्लीपमध्ये जामनेरमधील एक ग्रामस्थ पाणी नसल्याची तक्रार एकनाथ खडसे यांना करताना ऐकू येत आहे. त्यावर एकनाथ खडसे यांनी मग तुमचा आमदार गिरीश मेला का? असं वक्तव्य केलं. यावर गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली.

मी खडसे यांना दोष देणार नाही. वाढतं वय, एवढे आजार आणि त्यामध्ये जो माणूस मुख्यमंत्रीपदाची अपेक्षा करत होता त्याला बिचाऱ्याला आमदारकीपण मिळत नाहीय. त्यामुळे त्यांचं मानसिक संतुलन बिघडल्यासारखं आहे. त्यामुळे मला त्यांच्याबद्दल कोणताही रोष नाही. त्यांनी बोलत राहावं. लोकांना आणि सगळ्यांना कोण काय आणि कोण काय नाही ते माहिती आहे. पण खूप वेगळ्या मनस्थितीत ते सध्या आहेत, असा टोला महाजनांनी यावेळी लगावला. यावर परत एकनाथ खडसेंनी महाजनांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं.

माझी तब्येत एकदम ठणठणीत आहे. गिरीश भाऊ यांना खात्री करायची असेल तर ते करू शकतात, असं खडसे म्हणाले. मुख्यमंत्रीपदाचे स्वप्ने पाहणे काय गैर आहे? गिरीश भाऊंना राजकारणात जन्माला मी आणले. त्यांच्या राजकारणात आर्थिक मदत मी दिली. त्यांच्या प्रचारासाठी गल्लोगल्ली मी फिरलो. म्हणून आज गिरीश भाऊ दिसत आहेत. मी कोणाची हाजीहाजी करत नाही. मी कोणाचे पाय चाटत नाही. त्यामुळे गिरीश भाऊ तुम्ही माझी काळजी करण्याची गरज नाही. पहिले आपल्या मतदारसंघात पहा, असं जोरदार प्रत्युत्तर एकनाथ खडसेंनी यावेळी दिलं.

महत्वाच्या घडामोडी –

“राज्यात 15 मे पर्यंत लाॅकडाऊन वाढवला”

मुंब्र्यातील रुग्णालयात आग! या दुर्घटना रोखण्यासाठी महावसुली आघाडी सरकारला वेळ नाही; भातखळकरांची टीका

हे कोरोनाचे कमी आणि व्यवस्थेचे बळी जास्त- चित्रा वाघ

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी करून दाखवलं, आता दिल्लीलाही ‘महाराष्ट्र मॉडेल’ प्रमाणंच चालावं लागेल”