Home महाराष्ट्र मुंब्र्यातील रुग्णालयात आग! या दुर्घटना रोखण्यासाठी महावसुली आघाडी सरकारला वेळ नाही; भातखळकरांची...

मुंब्र्यातील रुग्णालयात आग! या दुर्घटना रोखण्यासाठी महावसुली आघाडी सरकारला वेळ नाही; भातखळकरांची टीका

मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं महाराष्ट्रातील प्रमाण वाढले असतानाच, दुसरीकडे रुग्णालयांमध्ये होत असलेल्या दुर्घटनांचे प्रमाणही वाढले आहे. ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथे असलेल्या एका खासगी रुग्णालयात आज पहाटे आग लागली. यावरुन भाजप नेते अतुल भातखळ कर यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.

मुंब्र्यातील रुग्णालयात आग; ICU वॉर्डमधील चार रुग्णांचा दुर्दैवी अंत झाल्याचे धक्कादायक वृत्त आले आहे. अंतहीन अशा या दुर्घटना रोखण्यासाठी महावसुली आघाडी सरकारला वेळही नाही आणि इच्छाही नाही, असं अतुल भातखळकर म्हणाले.

दरम्यान, लोकांचे रोज या ना त्या कारणामुळे हकनाक बळी जातायत याची बेशरम सरकारला चाड नाही, अशी टीकाही भातखळकरांनी यावेळी केली आहे.

महत्वाच्या घडामोडी –

हे कोरोनाचे कमी आणि व्यवस्थेचे बळी जास्त- चित्रा वाघ

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी करून दाखवलं, आता दिल्लीलाही ‘महाराष्ट्र मॉडेल’ प्रमाणंच चालावं लागेल”

“काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ गायकवाड यांचं कोरोनामुळं निधन”

ठाण्याच्या मुंब्रा येथील प्राईम क्रिटीकेअर हॉस्पिटलला आग, 4 रूग्णांचा मृत्यू