अहमदनगर : राज्यात कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशातच रेमडिसिवीर इंजेक्शनचा तुटवड्यामुळे मोठी समस्या निर्माण झाली आहे. याच स्थितीत भाजप खासदार डाॅ. सुजय विखे पाटील यांनी खास दिल्लीहून विमानाने नगरसाठी 10 हजार रेमडिसिवीर इंजेक्शन्स आणून परस्पर वाटप केलं होतं. या प्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. न्यायालयात याचिका दाखल झाल्यानंतर सुजय विखे पाटील यांनी यावर प्रतिक्रिया दिली.
मी जो काही व्हिडीओ काढला होता, तो सर्वांनी पाहिला आहे. मी त्या व्हिडिओमध्ये कोणतीही संख्या सांगितली नाही. त्यामुळे 10 हजारांचा आकडा कुणी काढला हे मला माहिती नाही. जिल्ह्यातील कोणत्याही आमदाराने या प्रकाराबद्दल मला विचारणा करावी, मी त्यांना उत्तर देण्यास तयार आहे, पण जिल्ह्याबाहेरील लोकांना उत्तर देण्यास मी बंधनकारक नाही, असं सुजय विखे पाटील म्हणाले.
जे इंजेक्शन तुम्ही वाटले ते जमा करणार आहात का, असा प्रश्न त्यांना यावेळी करण्यात आला. त्यावर त्यांनी ’इंजेक्शन आहे तरी कुठे? जे इंजेक्शन आले होते, ते आधीच वाटले आहे. चार दिवसांआधीच वाटप केलं होतं आणि नंतर मी व्हिडीओ तयार केला होता, असं सुजय विखे पाटलांनी स्पष्ट केलं. ते माध्यमांशी बोलत होते.
दरम्यान, ज्यांना कुणाला पुरावा हवा असेल त्याबद्दल कागद पत्र आहे. मी कोणत्याही कारवाईला घाबरत नाही. माझ्यामुळे ज्या रुग्णाचे जीव वाचले ते माझ्यासाठी महत्त्वाचे आहेत. आता रिकामे डबे उरलेले आहे, त्यांना घेऊन जायचे असेल तर घेऊन जाऊ शकता, असं सुजय विखे पाटील म्हणाले. तसेच माझ्यावर कोणताही गुन्हा दाखल झाला तर माझ्याकडे सर्व कागदपत्रे आहेत. मी कारवाईला घाबरत नाही, असंही सुजय विखे पाटील यांनी यावेळी म्हटलं.
महत्वाच्या घडामोडी –
मुंबईत कोरोना रूग्णांचा आकडा लपवला जातोय; देवेंद्र फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
RCB Vs DC ! दिल्ली कॅपिटल्सने टाॅस जिंकला, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय
“…तर आम्ही रूग्णांचे नातेवाईक आणि डाॅक्टर्संना सुजय विखे पाटलांचा नंबर दिला असता”
“फोन टॅपिंग प्रकरणी IPS अधिकारी रश्मी शुक्ला यांना चाैकशीसाठी समन्स”