मुंबई : केंद्र सरकारने महाराष्ट्राला रेमडेसिविर इंजेक्शन्स आणि ऑक्सिजनचा पुरवठा करताना इतर राज्यांच्या तुलनेत दुप्पट मदत केली आहे. त्यामुळे महाविकासआघाडीमधील बोलघेवड्या नेत्यांनी रोज उठून कांगावा करु नये, असं म्हणत राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते सोमवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
केंद्र सरकारने सोळा लाखांपैकी चार लाख 35 हजार रेमडेसीविर इंजेक्शनचा कोटा महाराष्ट्राला दिला आहे. तसेच 1100 व्हेंटिलेटर्सही दिले आहेत. मात्र, या मदतीनंतर मुख्यमंत्री वगळता एकाही महाविकासआघाडीच्या नेत्याने केंद्र सरकारचे आभार मानले नाहीत, अशी खंत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.
दरम्यान, सध्या लोक दु:खात आहेत. त्यामुळे त्यांना अशाप्रकारचे राजकारण पसंत पडणार नाही. केंद्र आणि राज्य सरकार आपापल्यापरीने महाराष्ट्राला मदत करत आहेत. त्यामुळे मदत मिळत नसल्याचा कांगावा बंद करावा, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी –
“संकटाला संधी मानून महाविकास आघाडी कधीच राजकारण करत नाही”
“मन की बात वेळीच समजून घेतली असती तर ही वेळच आली नसती”
सुपर ओव्हरचा थरार! दिल्लीचा हैदराबादवर रोमांचक विजय
ताई, टेस्ट निगेटिव्ह असली तरी…; धनंजय मुंडेंच बहिणीसाठी काळजीयुक्त ट्विट