मुंबई : सामनाचे संपादक संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंच्या घेतलेल्या मुलाखतीत राज्याची आर्थिक परिस्थिती हे मोठं आव्हान असून पैशाचं सोंग करता येत नाही,असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं. त्यांच्या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे, अशी टीका भाजप प्रवक्ते माधव भांडारी यांनी केली आहे.
राज्यात नवी गुंतवणूक येण्यासाठी महाराष्ट्र सरकारचे सबळ आणि सक्षम चित्र निर्माण होणं गरजेचं असताना उद्धव ठाकरे अशी हतबलता व्यक्त करतात, हे खेदाचं आहे, असं माधव भंडारी म्हणाले आहेत.
2014 साली राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर चुंबकीय शक्तीसारखे नवे उद्योग राज्यात आले त्यांनी हे मान्य केलं पण आता आलेले उद्योग गेले, असं म्हणून त्यांनी शिवसेनेकडे असलेल्या उद्योग खात्याचं अपयश मान्य केलं, असा टोलाही भांडारी यांनी ठाकरेंना लगावला आहे.
मुख्यमंत्री या नात्याने राज्यातले प्रश्न सोडवण्याबाबत त्यांनी आग्रही भूमिका घ्यायला पाहिजे मात्र कारभार हातात घेतल्यानंतर पहिल्या दोनच महिन्यात ते हतबलता व्यक्त करत आहेत, असंही माधव भंडारी यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
त्यांनी जर मनात आणलं तर यांना मुंबईत फिरणं अशक्य होईल; जयंत पाटलांचा आशिष शेलारांना टोला
तुमच्यासारखे व्हिलन असतील तर त्यांचा सुपडा साप करायला वेळ लागणार नाही- रुपाली चाकणकर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हेगडेंचा तात्काळ राजीनामा घ्यावा- जयंत पाटील
“हिमंत असेल तर भाजपने अनंतरकुमार हेगडेंना पक्षातून बाहेर काढून दाखवावं”