मुंबई : कोरोनाच्या महामारीत सुरू असलेल्या राजकारणावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे.
सध्या सगळेच संकटातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा वेळी एकमेकांचे दोष काढणं बरोबर नाही. मुंबईसह राज्यात कोरोनावर नियंत्रण येत आहे. त्यामुळं राजकारण करण्याची गरज नाही. सर्वांनी एकत्रं येऊन काम करावं. तरच संकटाला तोंड देता येईल., असं संजय राऊत म्हणाले. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
दरम्यान, या कोरोना परिस्थितीत राजकारण करणं योग्य नाही. राजकारण करण्याची आपली परंपरा नाही आणि सध्याच्या वातावरणात राजकारण करणंही योग्य नाही, असं म्हणतच संकट ही संधी मानून महाविकास आघाडी राजकारण करत नाही, असा टोलाही संजय राऊत यांनी यावेळी लगावला.
महत्वाच्या घडामोडी –
“मन की बात वेळीच समजून घेतली असती तर ही वेळच आली नसती”
सुपर ओव्हरचा थरार! दिल्लीचा हैदराबादवर रोमांचक विजय
ताई, टेस्ट निगेटिव्ह असली तरी…; धनंजय मुंडेंच बहिणीसाठी काळजीयुक्त ट्विट
ऑक्सिजन निर्मितीसाठी केंद्राने दिलेला निधी राज्याने गायब केला- प्रसाद लाड