मुंबई : वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर मागील काही महिन्यांपुर्वी तज्ञांनी देशभरात कोरोनाची मोठी लाट येईल असा इशारा दिला होता. तज्ञांनी खूप आधी दिलेला इशारा गांभीर्याने घेतला असता आणि आता येईल ती त्सुनामीच असेल ही दुसऱ्या लाटेची ‘मन की बात’ वेळीच समजून घेतली असती तर आज कोरोनाच्या त्सुनामीत देशाला गटांगळय़ा खाण्याची वेळ आली नसती, असा उपरोधक टोला शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना अग्रलेखातून लगावला आहे.
12 एप्रिल ते 1 ऑगस्ट 2021 या कालावधीत देशातील कोरोना मृतांची संख्या 3 लाखांच्या पार जाऊ शकते. वॉशिंग्टनच्या या संस्थेने दिलेला हा इशारा आता तरी केंद्र सरकारने गांभीर्याने घ्यायला हवा, असा सल्ला सामना अग्रलेखातून केंद्राला यावेळी देण्यात आला.
दरम्यान, कोरोनाची दुसरी लाट म्हणजे त्सुनामी ठरेल, असा इशारा तज्ञांनी दिला होता. या इशाऱ्यालाही केंद्रानं गांभीर्याने घेतले नाही. त्याचाच परिणाम म्हणून आज कोरोना रुग्ण आणि मृतांची संख्या याचे जागतिक विक्रम नोंदवले जात आहेत. ऑक्सिजनअभावी रुग्णांचे तडफडून मृत्यू होत आहेत. या सगळ्या परिस्थितीचे खापर फक्त कोरोनाच्या त्सुनामीवर फोडता येणार नाही, असंही सामना अग्रलेखात म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
सुपर ओव्हरचा थरार! दिल्लीचा हैदराबादवर रोमांचक विजय
ताई, टेस्ट निगेटिव्ह असली तरी…; धनंजय मुंडेंच बहिणीसाठी काळजीयुक्त ट्विट
ऑक्सिजन निर्मितीसाठी केंद्राने दिलेला निधी राज्याने गायब केला- प्रसाद लाड
“जोतीबा यात्रेवर कोरोनाचं सावट; मानकरीच पाॅझिटिव्ह आल्याने यात्रा रद्द”