मुंबई : एका पोलीस अधिकाऱ्याकडून वसुली करणाऱ्या या सरकारने ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांसाठी दिलेला निधी ‘खाऊन’ टाकला, अशी टीका भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी केली.
महाराष्ट्रात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभे करण्यासाठी केंद्र सरकारकडून पीएम केअर फंडातून निधी देण्यात आला होता. मात्र आघाडी सरकारने या निधीचा विनियोगच केला नाही. केंद्राने दिलेला निधी आणि मुख्यमंत्री निधीतून ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभे केले असते तर राज्यात ऑक्सिजन अभावी अनेकांचा बळी गेला नसता. केंद्र सरकारने ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांसाठी दिलेल्या निधीचे काय केले याचा आघाडी सरकारने हिशोब द्यावा, अशी मागणी प्रसाद लाड यांनी यावेळी केली.
दरम्यान, घरात बसलेल्या’ सरकारने कोरोनाची दुसरी लाट भयावह असणार आहे याची कल्पना असूनही या काळात अत्यावश्यक असलेल्या सुविधांच्या निर्मितीसाठींही काहीही केले नाही. या नाकर्त्या सरकारमुळेच आज राज्यातल्या सामान्य जनतेचा बळी जात आहे, अशी टीकाही प्रसाद लाड यांनी यावेळी केली.
महत्वाच्या घडामोडी –
“जोतीबा यात्रेवर कोरोनाचं सावट; मानकरीच पाॅझिटिव्ह आल्याने यात्रा रद्द”
सुजय विखे यांनी त्या बाॅक्समधून नेमकं काय आणलं?- रूपाली चाकणकर
जडेजा पडला आख्ख्या RCB संघावर भारी! चेन्नईचा 69 धावांनी विजय
“राऊतांनी फुकटचा सल्ला उद्धव ठाकरेंना दिला असता तर अर्थव्यवस्थेला गती देता आली असती”