Home क्रीडा जडेजा पडला आख्ख्या RCB संघावर भारी! चेन्नईचा 69 धावांनी विजय

जडेजा पडला आख्ख्या RCB संघावर भारी! चेन्नईचा 69 धावांनी विजय

मुंबई : IPL 2021 हंगामात वा सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघात झाला. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने धावांनी विजय मिळवला आहे.

चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. चेन्नईच्या फलंदाजांनी याचा पुरेपूर फायदा घेतला.

चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना बेंगलोरला 192 धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना बेंगलोरला 20 षटकात 9 बाद 122 धावाच करता आल्या.

चेन्नईने दिलेल्या 191 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बेंगलोरकडून विराट कोहली आणि देवदत्त पडीक्कल उतरले. यावेळी सुरुवातीपासूनच पडीक्कलने आक्रमक खेळ केला. मात्र, दुसऱ्या बाजूने त्याला साथ देणारा विराट सॅम करनच्या गोलंदाजीवर चौथ्या षटकात यष्टीरक्षक एमएस धोनीकडे झेल देऊन बाद झाला. त्यापाठोपाठ पाचव्या षटकात 15 चेंडूत 34 धावांवर खेळत असलेल्या पडीक्कलला शार्दुल ठाकूरने बाद करत बेंगलोरला दुसरा धक्का दिला. यानंतर बेंगलोरच्या फलंदाजांच्या नियमित अंतराने विकेट्स गेल्या. त्यामुळे चेन्नईच्या विजयाचा मार्ग सुकर झाला.

चेन्नईकडून रविंद्र जडेजाने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर इम्रान ताहिरने 2 विकेट्स घेतल्या. तसेच शार्दुल ठाकूर आणि सॅम करनने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आज रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन संघांमध्ये सामना खेळवला गेला. दोन्ही संघ यंदा चांगल्या फॉर्मात असल्याने हा मुकाबला रंगतदार होण्याची चाहत्यांना अपेक्षा होती. दोन्ही संघातील खेळाडूंनी दमदार प्रदर्शन करत चाहत्यांच्या अपेक्षा पूर्ण देखील केल्या.

दरम्यान, रवींद्र जडेजाने शेवटच्या षटकांमध्ये तुफान फटकेबाजी करत चाहत्यांची मने जिंकली. शेवटच्या षटकात त्याने मारलेल्या धावांनी त्याच्या नावे एक महत्त्वाचा विक्रमही नोंदवला गेला.

महत्वाच्या घडामोडी –

“राऊतांनी फुकटचा सल्ला उद्धव ठाकरेंना दिला असता तर अर्थव्यवस्थेला गती देता आली असती”

“…पण विश्वासघात झाला आणि आम्ही विरोधक झालो”

“स्फोटके कुणी ठेवली?; चंद्रकांत दादांनी या प्रकरणातील खरे काय ते सांगावं”

“दिल्लीतील लाॅकडाऊन 1 आठवड्यांनी वाढवला”