मुंबई : अर्थव्यवस्था गतिमान होण्यासाठी एका नव्या मनमोहन सिंगांची गरज आहे, असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या सामनामधील रोखठोक या सदरामध्ये आज केलं होतं. यावर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची अर्थव्यवस्था सक्षम ठेवण्यासाठी 20 लाख कोटींच पॅकेज दिलं. मला वाटतं संजय राऊत यांनी अशा प्रकारचा फुकटचा सल्ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना द्यावा, असा टोला प्रवीण दरेकर यांनी यावेळी लगावला.
दरम्यान, त्यामुळे महाराष्ट्राला गटांगळ्याच काय त्यापेक्षा दुर्दैवी असणाऱ्या अर्थव्यवस्थेला नीट गती देता येईल, असं म्हणत प्रविण दरेकर यांनी राऊतांवर टीकास्त्र सोडलं. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
महत्वाच्या घडामोडी –
“…पण विश्वासघात झाला आणि आम्ही विरोधक झालो”
“स्फोटके कुणी ठेवली?; चंद्रकांत दादांनी या प्रकरणातील खरे काय ते सांगावं”
“दिल्लीतील लाॅकडाऊन 1 आठवड्यांनी वाढवला”
“अर्थव्यवस्था गतिमान होण्यासाठी एका नव्या मनमोहन सिंगांची गरज आहे”