Home देश “दिल्लीतील लाॅकडाऊन 1 आठवड्यांनी वाढवला”

“दिल्लीतील लाॅकडाऊन 1 आठवड्यांनी वाढवला”

नवी दिल्ली : वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील लाॅकडाऊन 1 आठवड्याने वाढवण्याचा निर्णय दिल्ली सरकारने घेतला आहे.

ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे दिल्लीतील आरोग्य व्यवस्था हतबल झाली आहेत. अनेक रुग्णालयात ऑक्सिजनअभावी रुग्णांचे मृत्यू झाले असून, या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील दिल्ली सरकारने लॉकडाउन एका आठवड्याने वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. केजरीवाल यांनी पत्रकार परिषदे घेऊन याची माहिती दिली.

एका आठवड्यांनी लॉकडाउन वाढविण्यात आला आहे. त्यामुळे पुढील सोमवारी सकाळी ५ वाजेपर्यंत दिल्लीत लॉकडाउन असणार आहे. ‘ऑक्सिजन उत्पादक, पुरवठादार आणि रुग्णालये यांना प्रत्येक दोन तासांनंतरची अद्ययावत माहिती मिळावी यासाठी दिल्ली सरकारने पोर्टल सुरू करण्यात आलं आहे. यामुळे ऑक्सिजन पुरवठा व्यवस्थापनास सुसूत्रता येईल, अशी माहिती केजरीवालांनी दिली आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“अर्थव्यवस्था गतिमान होण्यासाठी एका नव्या मनमोहन सिंगांची गरज आहे”

मॉरिस चमकला; राजस्थानचा कोलकाता विरुद्ध 6 विकेट्सने विजय

अनिल देशमुखांच्या घरावर सीबीआयच्या छाप्यानंतर रुपाली चाकणकरांचं ट्विट; म्हणाल्या…

“अमित राज ठाकरे यांना रूग्णालयातून डिस्चार्ज”