मुंबई : IPL 2021 हंगामात 18 वा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात झाला. या सामन्यात राजस्थान रॉयल्सने 6 विकेट्सने विजय मिळवला.
राजस्थानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना कोलकाता संघाने राजस्थानला 134 धावांचे माफक आव्हान दिले. हे आव्हान राजस्थानने 18.5 षटकात 4 विकेट्स गमावत सहज पूर्ण केले.
राजस्थानने दिलेल्या 134 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानसाठी यशस्वी जयस्वाल आणि जोस बटलर यांनी सलामी दिली. कोलकाताचा फिरकीपटू वरुण चक्रवर्तीने चौथ्या षटकात बटलरला पायचित पकडले.
सुसाट सुरुवात केलेला यशस्वी जयस्वालही पॉवलप्लेमध्ये बाद झाला. 5 षटकात राजस्थानने 2 बाद 41 धावा केल्या. दोन्ही सलामीवीर माघारी परतल्यानंतर शिवम दुबे आणि कर्णधार संजू सॅमसनने डाव सांभाळला. 10 षटकात राजस्थानने 80 धावांपर्यंत मजल मारली. अर्धशतकी भागीदारीकडे वाटचाल करत असताना चक्रवर्तीने दुबेला माघारी धाडले. त्यानंतर आलेला राहुल तेवतियाही स्वस्तात माघारी परतला. वेगवान गोलंदाज प्रसिध कृष्णाने त्याला झेलबाद केले.
संजू सॅमसन आणि डेव्हिड मिलर यांनी 19 व्या षटकात राजस्थानच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. सॅमसनने 42 तर मिलरने 24 धावांची नाबाद खेळी केली.
दरम्यान, राजस्थानकडून ख्रिस मॉरिसने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तर जयदेव उनाडकट, चेतन सकारिया आणि मुस्तफिजूर रेहमान यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
महत्वाच्या घडामोडी –
अनिल देशमुखांच्या घरावर सीबीआयच्या छाप्यानंतर रुपाली चाकणकरांचं ट्विट; म्हणाल्या…
“अमित राज ठाकरे यांना रूग्णालयातून डिस्चार्ज”
“शिवसेना खासदार संजय राऊत यांना ‘मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती पुरस्कार’ जाहीर”