मुंबई : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील तुम्ही पुण्याचे सेवक आहात की पुनावालाचे? असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.
देशभरात कोरोना महामारीने थैमान घातले आहे. केंद्र सरकारच्या निष्काळजीपणा आणि गलथानपणाने संपूर्ण देशाला कोरोनाच्या खाईत ढकलले आहे. ऑक्सिजन, इतर आवश्यक औषधे आणि उपकरणांच्या कमरतेमुळे कोरोना रूग्ण तडफडून मरत आहेत., असं नाना पटोले म्हणाले.
सरकारसोबत मिळून लोकांच्या मदतीला धावून जाण्याऐवजी भाजपचे नेते हीन राजकारण करत आहेत. काँग्रसे नेते राहुल गांधी यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका करणारे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील आणि त्यांचा पक्ष कोरोना लसीच्या नफेखोरीला साथ देऊन मृतांच्या टाळूवरचे लोणी खात आहेत. तसेच भानावर येऊन ते पुण्याचे सेवक आहेत की पुनावालाचे याचे उत्तर द्यावे अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
तुम्ही हे वाचलंत का?
“सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. अरूण निगवेकर यांचं दीर्घ आजारानं निधन”
सरकारकडून पुरेशी मदत मिळत नसतानाही महाराष्ट्र कोरोनाविरोधातील लढाई पूर्ण ताकदीनिशी लढत आहे. देशातील भाजप शासीत राज्यांपेक्षा महाराष्ट्र कोरोनाचा अत्यंत चांगल्या पद्धतीने मुकाबला करत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी केंद्र सरकारला वारंवार कोरोनाच्या संभाव्य धोक्याबाबत सावध करत आहेत, असंही नाना पटोले यांनी म्हटलं आहे.
चंद्रकांत पाटील, तुम्ही पुण्याचे सेवक आहात की पुनावालाचे?: प्रदेशाध्यक्ष मा. नाना पटोले
कोरोना लसीच्या नफेखोरीला साथ, हा मृतांच्या टाळूवरचे लोणी खाण्याचाच प्रकार. pic.twitter.com/Ktav16PeA3
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) April 23, 2021
महत्वाच्या घडामोडी –
ऑक्सिजनसाठी सातारा-कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमेवर टँकर अडवला; दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांमध्ये वाद
ऑक्सिजनसाठी सातारा-कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमेवर टँकर अडवला; दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांमध्ये वाद
महाराष्ट्राला ऑक्सिजन, रेमडेसिवीर, लस पुरवठा वाढवा; मुख्यमंत्र्यांची पंतप्रधान मोदींकडे मागणी