Home महाराष्ट्र महाराष्ट्राला ऑक्सिजन, रेमडेसिवीर, लस पुरवठा वाढवा; मुख्यमंत्र्यांची पंतप्रधान मोदींकडे मागणी

महाराष्ट्राला ऑक्सिजन, रेमडेसिवीर, लस पुरवठा वाढवा; मुख्यमंत्र्यांची पंतप्रधान मोदींकडे मागणी

मुंबई : वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राला ऑक्सिजन, रेमडेसिवीर, लस पुरवठा वाढवा, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली आहे. आज ते पंतप्रधान मोदी यांच्यासमवेत कोविडसंदर्भात आयोजित बैठकीत बोलत होते.

व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित या बैठकीत देशातील सर्वात जास्त कोविड संसर्ग फैलावलेल्या इतर राज्यांचेही मुख्यमंत्री होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी लक्षणे नसलेल्या किंवा सौम्य लक्षणांच्या रुग्णांना गृह विलगीकरणात ठेवून त्यांना डॉक्टरांच्या सल्ल्याने आवश्यक ती औषधे देऊन उपचार करण्यात येत आहेत तसेच निवृत्त डॉक्टर्सच्या जोडीने वैद्यकीय विद्यार्थ्यांची मदत घेण्यात येत आहे, अशी माहिती दिली.

महाराष्ट्राला अधिक ऑक्सिजनची गरज असून रेमडेसिवीरचा पुरेसा पुरवठा ही आवश्यक आहे. ऑक्सिजन विमानाने आणणे शक्य नसल्यास वेळ वाचविण्यासाठी रिकामे टँकर्स विमानाने प्लॅंट्सच्या ठिकाणी पाठवून ऑक्सिजन भरून इतर मार्गाने राज्याला मिळावा अशी मागणी उद्धव ठाकरेंनी यावेळी केली. तसेच ब्रिटनमध्ये मोठ्या प्रमाणावर लसीकरण झाल्याने त्यांना संसर्ग थोपवता आलेला आहे. आपल्याकडे लस उत्पादक कंपन्यांची मर्यादित क्षमता पाहता त्यामुळेच इतर देशांतून उत्पादन होत असलेल्या लसी आम्ही आयात करून लसीकरण अधिक गतीने वाढवू शकतो का यावर मार्गदर्शन करावे., असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

तुम्ही हे वाचलंत का?

“देवों का देव महादेव फेम अभिनेता मोहित रैनाला कोरोनाची लागण”

दरम्यान, रेमडेसिवीर किती उपयुक्त आहे ते सांगता येत नाही पण रुग्णांचा रुग्णालयांतील कालावधी निश्चितपणे कमी करत आहे. त्यादृष्टीने राज्याला रुग्ण संख्येनुसार पुरेसा पुरवठा व्हावा असंही ते म्हणाले. तसेच रेमडेसिवीर व्यतिरिक्त इतर आवश्यक औषधांचा देखील तुटवडा भासू शकतो, हे लक्षात घेऊन केंद्राने तो पुरवठाही नियमित होत राहील, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.

महत्वाच्या घडामोडी –

पवारसाहेब, तुम्ही काही करु नका, तुमचे कारखाने हवेतला ऑक्सिजनही सोडणार नाहीत- निलेश राणे

महाविकासआघाडी सरकारमुळे महाराष्ट्रात मरण स्वस्त झालंय- प्रवीण दरेकर

दिल्लीच्या सर गंगाराम रुग्णालयात ऑक्सिजनच्या अभावी 25 रुग्णांचा मृत्यू; 60 जणांचा जीव धोक्यात