मुंबई : राज्यात वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर बेड आणि ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे मोठी समस्या उद्भवली आहे. पंतप्रधान नरेेंद्र मोदींनीही ऑक्सिजन देण्यासाठी काहीतर करा, असं आवाहन केलं आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे सर्वासर्वा शरद पवार यांनी राज्यातील साखर कारखान्यांना पत्र लिहित ऑक्सिजन निर्मितीसाठी पत्र लिहिलं आहे.
राज्यातील सर्व सहकारी कारखाने तसेच 190 खाजगी कारखान्यांना पत्र पाठवण्यात आलं आहे. शरद पवारांच्या सूचनेनुसार मांजरीतल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटकडून साखर कारखान्यांना पत्र पाठवण्यात आलं आहे. याशिवाय जे कारखाने बंद आहेत त्यांनी ऑक्सिजन किट खरेदी करून रुग्णालयांना पुरवावं, असं आवाहन शरद पवार यांनी केलं आहे. यावर भाजप नेते निलेश राणे यांनी प्रतिक्रिया देत शरद पवारांवर निशाणा साधला आहे.
साहेब आपण काही करू नका महाराष्ट्राचे डॉक्टर्स व या क्षेत्रातील इंडस्ट्रीज ह्या विषयाचा मार्ग काढतील. तुमचे साखर कारखाने या विषयात जर घुसले तर माणसासाठी हवेतला ऑक्सिजन पण सोडणार नाही. अगोदरच सॅनिटायझर बनवण्याच्या नावाखाली साखरकारखान्यांनी महाराष्ट्राचे पैसे गिळले असतील., असं म्हणत निलेश राणेंनी शरद पवारांवर हल्लाबोल केला आहे.
तुम्ही हे वाचलंत का?
महाविकासआघाडी सरकारमुळे महाराष्ट्रात मरण स्वस्त झालंय- प्रवीण दरेकर
साहेब आपण काही करू नका महाराष्ट्राचे डॉक्टर्स व या क्षेत्रातील इंडस्ट्रीज ह्या विषयाचा मार्ग काढतील. तुमचे साखर कारखाने या विषयात जर घुसले तर माणसासाठी हवेतला ऑक्सिजन पण सोडणार नाही. अगोदरच सॅनिटायझर बनवण्याच्या नावाखाली साखरकारखान्यांनी महाराष्ट्राचे पैसे गिळले असतील. https://t.co/6cnJEt7kUm
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) April 23, 2021
महत्वाच्या घडामोडी –
दिल्लीच्या सर गंगाराम रुग्णालयात ऑक्सिजनच्या अभावी 25 रुग्णांचा मृत्यू; 60 जणांचा जीव धोक्यात
महाराष्ट्रात कोविड मृत्यूतांडव सुरू, राजेश टोपेंना घरी बसवलं पाहिजे- किरीट सोमय्या
“चंद्रकातदादा म्हणाले झोप कमी करा; अजित पवार म्हणतात…”