मुंबई : नाशिकमध्ये ऑक्सिजन गळतीमुळे 24 रुग्णांचे प्राण गेल्यानंतर, आता विरारमधल्या विजय वल्लभ हॉस्पिटलमध्ये घडलेल्या भयनाक आगीच्या घटनेत 13 करोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यावरुन विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी महाविकासआघाडी सरकारवर निशाणा साधलाय.
महाराष्ट्रातील रुग्णालय आग प्रतिबंधक सुरक्षा व्यवस्था रामभरोसे आहे. भंडारा,भांडूप,नागपूर आणि आता विरार कोविड रुग्णालयांना आगी लागल्या, नाशिकला ऑक्सिजन गळती झाली. करोनापेक्षा “सरकारी मुर्दाडपणामुळे” अनेक निष्पापांना जीव गमवावा लागला, असं प्रवीण दरेकर म्हणाले आहेत.
तुम्ही हे वाचलंत का?
दिल्लीच्या सर गंगाराम रुग्णालयात ऑक्सिजनच्या अभावी 25 रुग्णांचा मृत्यू; 60 जणांचा जीव धोक्यात
सुसाईट डेस्टिनेशन”ची फुशारकी मारणाऱ्या महाविकास आघाडी सरकारमुळे महाराष्ट्रात मरण स्वस्त झालंय ! मृतांना श्रद्धांजली! त्यांच्या कुटुंबाच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, असंही प्रवीण दरेकरेंनी म्हटलं आहे.
“सुसाईट डेस्टिनेशन”ची फुशारकी मारणाऱ्या महाविकास आघाडी सरकारमुळे महाराष्ट्रात मरण स्वस्त झालंय !
मृतांना श्रद्धांजली! त्यांच्या कुटुंबाच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.@CMOMaharashtra @rajeshtope11 @BJP4Maharashtra— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) April 23, 2021
महत्वाच्या घडामोडी –
महाराष्ट्रात कोविड मृत्यूतांडव सुरू, राजेश टोपेंना घरी बसवलं पाहिजे- किरीट सोमय्या
“चंद्रकातदादा म्हणाले झोप कमी करा; अजित पवार म्हणतात…”
“विरारमधील दुर्घटनेची चौकशी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश”