Home देश दिल्लीच्या सर गंगाराम रुग्णालयात ऑक्सिजनच्या अभावी 25 रुग्णांचा मृत्यू; 60 जणांचा जीव...

दिल्लीच्या सर गंगाराम रुग्णालयात ऑक्सिजनच्या अभावी 25 रुग्णांचा मृत्यू; 60 जणांचा जीव धोक्यात

नवी दिल्ली : देशातील कोरोनाची परिस्थिती अत्यंत भयानक होत आहे. ऑक्सिजनच्या अभावी अनेक रुग्णांचा जीव धोक्यात आल्याचं दिसून येतंय. त्यातच आता दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात गंभीर स्थितीत असलेल्या 25 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सर गंगाराम रुग्णालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं की, रुग्णालयात गेल्या 24 तासांत 25 आजारी रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ऑक्सिजनचा पुरवठा अजून केवळ दोनच तास चालेल. व्हेन्टिलेटर आणि बीआयपीएपी मशिन प्रभावीपणे काम करत नाहीत. त्यामुळे गंभीर स्थितीत असलेल्या 60 रुग्णांचा जीव धोक्यात आला आहे.

तुम्ही हे वाचलंत का?

महाराष्ट्रात कोविड मृत्यूतांडव सुरू, राजेश टोपेंना घरी बसवलं पाहिजे- किरीट सोमय्या

दरम्यान, ऑक्सिजनच्या अभावी या रुग्णांना आपला जीव गमवावा लागल्याचं सांगण्यात येतंय.

महत्वाच्या घडामोडी –

“चंद्रकातदादा म्हणाले झोप कमी करा; अजित पवार म्हणतात…”

“विरारमधील दुर्घटनेची चौकशी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश”

धक्कादायक! विरार येथे रुग्णालयाला आग, 13 करोना रुग्णांचा मृत्यू