Home महाराष्ट्र महाराष्ट्रात कोविड मृत्यूतांडव सुरू, राजेश टोपेंना घरी बसवलं पाहिजे- किरीट सोमय्या

महाराष्ट्रात कोविड मृत्यूतांडव सुरू, राजेश टोपेंना घरी बसवलं पाहिजे- किरीट सोमय्या

मुंबई : विरार येथे एका रुग्णालयाला आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत 13 रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेने महाराष्ट्रा पुन्हा एकदा हादरला आहे. यावर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी प्रतिक्रिया देत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यावर निशाणा साधला आहे.

महाराष्ट्रात कोविड मृत्यूतांडव सुरू आहे. ठाकरे सरकारने आता हा प्रतिष्ठेची मुद्दा न बनवता केंद्र सरकार, लष्कराची मदत घ्यावी. महाराष्ट्रातील सर्व कोविड केंद्रामधील ऑक्सिजन आणि फायर ऑडिट तातडीने करण्यात यावं. यासाठी या श्रेत्रातील तज्ज्ञांची मदत घेण्यात यावी. तसेच महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपेंना घरी बसवलं पाहिजे, असं ट्विट करत किरीट सोमय्या यांनी राजेश टोपे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

तुम्ही हे वाचलंत का?

“चंद्रकातदादा म्हणाले झोप कमी करा; अजित पवार म्हणतात…”

महत्वाच्या घडामोडी –

“विरारमधील दुर्घटनेची चौकशी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश”

धक्कादायक! विरार येथे रुग्णालयाला आग, 13 करोना रुग्णांचा मृत्यू

विराटसेनेचा विजयी चौकार; बेंगलोरचा 10 विकेट्सने ‘रॉयल’ विजय