Home महाराष्ट्र “विरारमधील दुर्घटनेची चौकशी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश”

“विरारमधील दुर्घटनेची चौकशी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश”

मुंबई : विरार येथे एका रुग्णालयाला आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत 13 रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेने महाराष्ट्रा पुन्हा एकदा हादरला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत.

संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आग विझवणे व इतर रुग्णांवरील उपचार सुरू राहतील याकडे लक्ष देण्यास उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे. उपचार घेत असलेल्या इतर रुग्णांना झळ पोहचू नये याकडे लक्ष देत त्यांची लगेचच इतरत्र व्यवस्था करावी असे निर्देश देण्यात आले आहेत.

धक्कादायक! विरार येथे रुग्णालयाला आग, 13 करोना रुग्णांचा मृत्यू

राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनीही याप्रकरणी पोलीस महासंचालकांना चौकशीचे आदेश दिले आहेत.

“विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयात अतिदक्षता विभागास आग लागून काही रुग्णांचा मृत्यू झाल्याप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आग विझवणे व इतर रुग्णांवरील उपचार सुरू राहतील याकडे लक्ष देण्यास सांगितले,” अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने ट्विट करत दिली आहे.

महत्वाच्या घडामोडी –

विराटसेनेचा विजयी चौकार; बेंगलोरचा 10 विकेट्सने ‘रॉयल’ विजय

लॉकडाऊनचा निर्णय मान्य, पण…- अमृता फडणवीस

“भाजपच्या भाडोत्री ट्रोलर्सकडून काँग्रेस नेत्यांना ट्रोल करण्याचं काम सुरु”