मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भारतात सुरु असलेल्या लसीकरण मोहीमेबाबत काँग्रस अध्यक्षा सानिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्र लिहिलं होतं. त्यावर बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर निशाणा साधलाय.
सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि मनमोहन सिंग यांनी सातत्याने पंतप्रधान मोदी, आरोग्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना कोरोनाच्या परिस्थितीबाबत वारंवार अवगत केलं. पण त्यांच्या माफक सूचनांकडे भाजपकडून फक्त उलट प्रतिक्रिया देण्यात आल्या. भाजपने त्यांच्या भाडोत्री ट्रोलर्सकडून आमच्या नेत्यांना ट्रोल करण्याचं काम केलं, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.
तुम्ही हे वाचलात का?
“RCB VS RR IPL-2021! राॅयल चॅलेंजर्स बेंगलोरने टाॅस जिंकला, गोलंदाजी करण्याचा निर्णय”
महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. तो रोखण्यासाठी राज्य सरकारने लॉकडाऊनचं पाऊल उचललं आहे. आम्हाला लोकांचा जीव वाचवणं महत्वाचं वाटतं. त्यामुळे आजपासून राज्यात कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आलाय. जनतेनं या निर्णयाचं स्वागत केलंय. लॉकडाऊनचं पालनही होईल आणि महाराष्ट्र देशातील पहिलं कोरोनामुक्त राज्य ठरेल, असा दावाही पटोले यांनी यावेळी केलाय.
महत्वाच्या घडामोडी –
“खोटे उत्सव आणि रिकामी बडबड नकोय, देशाला उपाययोजना हव्यात”
“काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व दिल्लीचे माजी आरोग्यमंत्री डाॅ.ए.के.वालिया यांचं कोरोनामुळं निधन”
तुम्ही उधार घ्या, चोरी करा पण रूग्णांना ऑक्सिजन द्या; दिल्ली उच्च न्यायालयानं केंद्राला सुनावलं