मुंबई : IPL 2021 हंगामात 15 वा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात झाला. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने 18 धावांनी विजय मिळवला आहे.
चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 3 बाद 22 धावांचं आव्हान दिलं. या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाताला 19.1 षटकात सर्वबाद 202 धावाच करता आल्या.
चेन्नईने दिलेल्या धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या कोलकाता संघाची सुरुवात अत्यंत खराब झाली. मात्र आंद्रे रसल आणि दिनेश कार्तिकने चांगला खेळ केला. आंद्र रसलने आक्रमक खेळ करताना 22 चेंडूत 3 चौकार आणि 6 षटकारांसह 54 धावांची खेळी केली. त्याने कार्तिकसह 81 धावांची भागीदारी केली. यानंतर पॅट कमिन्सने आक्रमक अंदाजात फलंदाजी करताना अर्धशतक केले. पण अखेर दुसऱ्या बाजूने विकेट्स गेल्याने कोलकाताचा डाव 202 धावांवर संपला.
तुम्ही हे वाचलात का?
“उद्या रात्रीपासून राज्यात कडक निर्बंध लागू”
कोलकाताकडून पॅट कमिन्सने शानदार नाबाद 66 धावा केल्या. तर आंद्रे रसेलने 54 धावांची झंझावाती खेळी केली. तसेच दिनेश कार्तिकने 40 रन्स केल्या. तर चेन्नईकडून दीपक चाहरने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तसेच लुंगी एन्गिडीने 3 विकेट्स घेतल्या आणि सॅम करनने 1 विकेट घेतली.
महत्वाच्या घडामोडी –
मोठी बातमी! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उद्या नाशिकला जाण्याची शक्यता
नाशिक महापालिका आयुक्तांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा- प्रवीण दरेकर
नाशिक ऑक्सिजन गळती! मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे