Home महाराष्ट्र “नवाब मलिक सच्चे मुसलमान नाहीत, ते अल्लाहचे गुनाहगार आहेत”

“नवाब मलिक सच्चे मुसलमान नाहीत, ते अल्लाहचे गुनाहगार आहेत”

मुंबई : ब्रुक फार्मा कंपनीच्या मालकाविरोधातील पोलीस कारवाईनंतर भाजपा नेत्यांनी घेतलेल्या भूमिकेवरुन नवाब मलिक यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करत केंद्र सरकार औषध कंपन्यांना धमकावत असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. यावर राजेंद्र शिंगणे यांनी रेमडेसिविरचा राज्यात अनधिकृत साठा नसल्याचं सांगितल्यानंतर भाजपाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपा अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी नवाब मलिक यांच्यावर निशाणा साधला आहे.

नवाब मलिक सच्चे मुसलमान नाहीत किंवा ते अल्लाहचे गुनाहगार आहेत असं तुषार भोसले म्हणाले आहेत.

तुम्ही हे वाचलात का?

…तर पुण्याचं पालकमंत्रीपद सोडा- चंद्रकांत पाटील

“रमजानच्या पवित्र महिन्यात वाईट काम करायचं नसतं आणि खोटं बोलायचं नसतं हे लहान मुलालाही कळतं. पण राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक लोक आज महाभयानक अशा संकटात खोटं बोलून समाजात विष पेरण्याचं काम करत आहेत. विशेष म्हणजे त्यांच्याच लोकांनी त्यांना उघडं पाडलं,” असंही तुषार भोसले यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार पुन्हा हाॅस्पिटलमध्ये”

“भाजपचे नेते रेमेडेसिविर इंजेक्शन विकत घेऊन सरकारला देणार होते, हे सपशेल खोटं”

अनुभवी रोहितवर नवखा पंत पडला भारी; दिल्लीचा मुंबईवर 6 गडी राखून विजय