मुंबई : करोनाची कोणतीही लक्षणं दिसली तर ताबडतोब तपासणी करून घ्या. दुखणं अंगावर काढू नका असं आवाहन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे.
आपण सर्वजण करोनाच्या महामारीशी लढत असल्याने काही महत्वाच्या सूचना मी देऊ इच्छितो. आपल्याला थोडी लक्षणं आढळली तरी चाचणी करुन घ्यावी. रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर लगेचच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, उपचार करा. कोणत्याची परिस्थितीत अंगावर दुखणं अंगावर काढू नये, असं राजेश टोपे म्हणाले आहेत.
“राज्यात 15 दिवसांचा लाॅकडाऊन लागणार”
दरम्यान, जिल्ह्या जिल्ह्यांमध्ये माझा जो अभ्यास दिसतो तो एकच दाखवतो की उशीर झाल्याने रुग्ण दगावला, त्यामुळे कृपया दुखणं अंगावर काढू नका,” असंही राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.
घाबरू नका पण… जागरूक रहा… pic.twitter.com/mobPYKS2hB
— Rajesh Tope (@rajeshtope11) April 20, 2021
महत्वाच्या घडामोडी –
“काँग्रेस नेते राहुल गांधी कोरोना पाॅझिटिव्ह”
“राज ठाकरेंचे सुपूत्र अमित ठाकरे यांना कोरोनाची लागण”
ज्येष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांचं करोनाने निधन