Home महाराष्ट्र जीव वाचविण्यासाठी रेमडिसिवीर गरजेचं असताना विरोधी पक्षनेत्यांनी पोलिस ठाण्यात जाणं ही शरमेची...

जीव वाचविण्यासाठी रेमडिसिवीर गरजेचं असताना विरोधी पक्षनेत्यांनी पोलिस ठाण्यात जाणं ही शरमेची बाब

जळगाव : रेमडेसिविर इंजेक्शन्सची समस्या सध्या संपूर्ण राज्याला भेडसावत आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून यावरुन सुरु असलेल्या टीव्हीवरच्या बातम्या बघून आता मलाही कंटाळ आला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अशा परिस्थितीत महाराष्ट्राला मदत करणे अपेक्षित होतं, असं राज्याचे पाणीपुरवठा मंत्री आणि शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.

जनतेचा जीव वाचवण्यासाठी रेमडेसिविर इंजेक्शन गरजेचे असताना विरोधी पक्षनेत्यांनी त्यासाठी पोलीस ठाण्यात जाणे, ही शरमेची बाब असल्याचे गुलाबराव पाटलांनी म्हटलं. ते जळगावमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

तुम्ही हे वाचलात का?

शिवसेना आमदार संजय गायकवाड यांची पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांवर टीका, म्हणाले…

फडणवीसांनी तेथे न जाता रेमेडीसिवीर राज्यातील जनतेला कसे मिळेल यासाठी पंतप्रधानांकडे प्रयत्न केले असते तर त्यांचीही वाहवा झाली असती. तेही राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत, केंद्रातही त्यांचे सरकार आहे., असंही पाटील म्हणाले.

दरम्यान, रेमेडीसिवीर हा राज्याला भेडसावणारा प्रश्न आहे. त्यामुळे त्यांच्यात राजकारण न करता ज्या प्रमाणे त्यांनी लॉकडाऊन करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत भाग घेतला होता, त्याचप्रमाणे रेमडेसिविर मिळवून देण्यासाठी फडणवीसांनी मदत करायला पाहिजे होती, ही जनतेची अपेक्षा होती. मात्र, ते पोलीस ठाण्यात गेले, ही शरमेची बाब आहे, असंही गुलाबराव पाटील यांनी यावेळी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी –

राजस्थानची चेन्नईसमोर शरणागती; चेन्नईचा 45धावांनी दणदणीत विजय

“लाॅकडाऊनबाबतची नवी नियमावली जारी; पहा काय सुरू, काय बंद?”

“मोठी बातमी! 1 मे पासून 18 वर्षांवरील सर्वांना कोरोना लस मिळणार”