Home महाराष्ट्र “रेमडेसिवीरची साठेबाजी करणाऱ्याला ताब्यात घेतले यात पोलिसांचा काय दोष?”

“रेमडेसिवीरची साठेबाजी करणाऱ्याला ताब्यात घेतले यात पोलिसांचा काय दोष?”

मुंबई : रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा करण्यात आल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी ब्रुक्स फार्मा कंपनीचे मालक राजेश डोकानिया यांना ताब्यात घेतलं. याची माहिती मिळताच काल रात्री  देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांच्यासह भाजपचे इतर नेते पोलीस ठाण्यात पोहोचले होते. यावर काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

तुम्ही हे वाचलात का?

हैदराबादच्या पराभवाची हॅट्रिक; मुंबई इंडियन्सचा 13 धावांनी विजय

एका व्यावसायिकासाठी मुंबई पोलिस वर दबाव आणणाऱ्या देवेंद्र फडणवीसजी आणि प्रवीण दरेकरजी या दोन्ही विरोधी पक्षनेत्यांना पाहून आश्चर्य वाटते. पोलिसांचा दोष काय? त्यांच्याकडे माहिती होती की रेमॅडेसीवीरच्या 60000 इंजेक्शनचा मोठा साठा ब्रूक लॅबोरेटरीजच्या निर्यातदारांकडे लपवला आहे., असं म्हणत सचिन सावंत यांनी फडणवीस आणि दरेकरांवर टीकास्त्र सोडलं आहे.

ज्याची माहिती दडवली आहे. निर्यात बंदी झाल्यावर कंपनीने CDSCO ला आणि राज्य FDA ला स्टॉक कळविणे आवश्यक आहे. मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी संचालकाला बोलावले पण त्याने उडवाउडवी केली. दोन दिवसांनी तो आला. परंतु भाजप नेते इतके बिथरले की त्याच्या मदतीला स्वतः फडणवीस जी रात्रीसुध्दा धावले, असा टोला सचिन सावंत यांनी यावेळी लगावला.


कोरोना महामारी मध्ये रेमडेसीवीरची प्रचंड कमतरता असताना पोलिसांकडून काय अपेक्षा असेल? चौकशीसाठी ते कोणाला बोलावू शकत नाहीत? भाजपा नेते जनसामान्यांसाठी अशी पावले उचलतात का?आपलं कर्तव्य तत्परतेने बजावणाऱ्या डीसीपी मंजुनाथ सिंगे आणि टीमचे जाहीर अभिनंदन व भाजपा नेत्यांचा जाहीर निषेध!, असं म्हणत सचिन सावंत यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.

महत्वाच्या घडामोडी –

गडकरी-फडणवीस यांनी हवेत कोविड हॉस्पिटल बांधली का?; विजय वडेट्टीवारांचा सवाल

आरोप सिद्ध करा, अन्यथा राजीनामा द्या; प्रवीण दरेकरांचं नवाब मलिकांना आव्हान

“परदेशातील लोकांना लस द्यायची आणि आपल्या देशातील लोकांना मारायचा असा केंद्र सरकारचा धंदा”