मुंबई : करोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने राज्यात कडक निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. कडक निर्बंधांच्या काळात शिवभोजन थाळी मोफत दिली जात आहे. या मुद्द्यावरून भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय.
“माननीय मुख्यमंत्री (मा .मु.) कुछ समझ में नही आया… मामु शिवभोजन थाळी खानेका है… लेकिन जानेका कैसे?”, असा सवाल करत गोपीचंद पडळकरांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.
तुम्ही हे वाचलात का?
पुण्यात कोण तुमचं ऐकत नाही आणि…; निलेश राणेंची अजित पवारांवर टीका
दरम्यान, या संदर्भात गोपीचंद पडळकरांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांना पोलीस अडवताना दिसत आहेत. तर काहींना घराबाहेर पडले म्हणून शिक्षा देताना दिसत आहे.
‘माननीय मुख्यमंत्री (मा .मु.) कुछ समझ में नही आया… मामु शिवभोजन थाळी खानेका है..लेकीन जानेका कैसे?’#गोलमाल#शिवभोजन_थाळी#lockdown#बिघाडी_सरकार pic.twitter.com/jkHXVZyB8E
— Gopichand Padalkar (@GopichandP_MLC) April 17, 2021
महत्वाच्या घडामोडी –
“केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांना कोरोनाची लागण”
“शिवाजी द बाॅस फेम अभिनेते विवेक यांचं निधन”
“फडणवीसांकडून अपेक्षाच नाही, भेटीसाठी साडेचार वर्ष थांबलेलो”