मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंढरपुरातील सभेत काल भाजपला सरकार पाडून दाखवण्याचं आव्हान दिलं होतं. राज्यातील सरकार पाडणं म्हणजे काय खेळ वाटतो काय?, हे सरकार पाडणारा अजून जन्माला यायचा आहे, हे कोणा येड्या गबाळ्याचे काम नाही, असं अजित पवार म्हणाले होते. यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
खरंतर सरकार पडणार आहे याची अजित पवारांना जाणीव आहे. कधी आणि कसं पडणार हेही त्यांना माहीत आहे. त्यामुळं त्यांनी उगाच खोटा आव आणू नये, असा टोला चंद्रकांत पाटलांनी यावेळी लगावला.
दरम्यान, अजित पवारांनी जास्त गमजा मारण्याची गरज नाही. कालचक्र हे कायम फिरत असतं. माणसानं नम्र राहून नीट बोलायला हवं. सरकार पडणार नसेल तर ते इतका आकांडतांडव कशासाठी करत आहेत? आजार झालेलाच नसेल तर तो झाला नाही असं सांगत फिरण्याची काय गरज आहे?, असा प्रश्नही चंद्रकांत पाटलांनी यावेळी उपस्थित केला.
महत्वाच्या घडामोडी –
चंद्रकांत पाटील हा मोदी लाटेत लॉटरी लागलेला माणूस – अजित पवार
ठाकरे सरकारकडून करोना रुग्णांच्या मृत्यूच्या आकडेवारीची लपवाछपवी; किरीट सोमय्यांचा आरोप
राज्यात सत्ताबदल कसा होणार हे अजित पवारांना माहिती आहे- चंद्रकांत पाटील