पंढरपूर : चंद्रकांत पाटील आणि भाजपच्या नेत्यांना ग्रामीण भागाशी काहीही देणघेणं नाही. चंद्रकांत पाटील हा मोदी लाटेत लॉटरी लागलेला माणूस आहे. अशी टीका उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केली. ते बुधवारी पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारसभेत बोलत होते.
चंद्रकांत पाटील यांनी कधी कुठलीही संस्था काढलेली नाही, कुठलीही बँक किंवा कारखाना चालवलेला नाही, कुठलीही विकास सोसायटी किंवा मजूर सोसायटी चालवलेली नाही. टरबूज-खरबुज सोसायटी कधी काढली नाही. त्यांना ग्रामीण भागाच्या प्रश्नांशी काहीही देणघेणं नाही. नरेंद्र मोदी साहेबांच्या नावाचा झंझावात आल्यामुळे त्यांना लॉटरी लागलेली आहे. ही गोष्ट पंढरपूरच्या मतदारांनी समजून घ्यावी, असं अजित पवार म्हणाले आहेत.
दरम्यान, शेतकरी आणि गोरगरीबांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी भगीरथ भालके यांना प्रचंड मताधिकाऱ्याने विधानसभेवर निवडून पाठवा, असं आवाहन अजित पवार यांनी यावेळी केलं.
महत्वाच्या घडामोडी –
ठाकरे सरकारकडून करोना रुग्णांच्या मृत्यूच्या आकडेवारीची लपवाछपवी; किरीट सोमय्यांचा आरोप
राज्यात सत्ताबदल कसा होणार हे अजित पवारांना माहिती आहे- चंद्रकांत पाटील
“शरद पवारांनी स्वत:च्या स्वार्थासाठी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री बनवलं”